मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा इकबाल मिर्चीच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव मंगळवारी होऊ शकला नाही. याचे कारण म्हणजे अर्थ मंत्रालयाकडून आयोजित लिलावामध्ये बोली लावणाऱ्या व्यक्तींना लिलावाच रक्कम मोठी वाटत होती. राखीव ठेवलेली 3 कोटी 54 लाख रुपयांची बोली ही बाजार भावापेक्षा अधिक वाटत होती. त्यामुळे पुन्हा लवकरच लिलावाची नवीन तारीख ठरवून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जानेवारीला
मंगळवारी मुंबईतील इकबाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांसह इतर प्रकरणातील 6 प्रॉपर्टीचा लिलाव होणार होता. हा लिलाव स्मग्लर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एक्ट एजन्सीच्या कार्यालयात होणार होता. इकबाल मिरचीची मुंबईतील सांताक्रूज पश्चिमच्या मिल्टन अपार्टमेंट्स मध्ये फ्लॅट नंबर 501 आणि 502 अशी संपत्ती आहे.
हेही वाचा - चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कोल्हापुरात निषेधाचे पोस्टर जाळले