मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इकबाल मिर्ची याच्या मालकीच्या संपत्तीचा लिलाव आज (मंगळवारी) मुंबईत वित्त मंत्रालयाकडून केला जात आहे. या दोन्ही संपत्ती मुंबईतील सांताक्रुज परिसरात आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या 2 फ्लॅटची आरक्षित किंमत 3 कोटी 45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा- शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
दाऊदचा खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा इकबाल मिर्ची हा अंमली पदार्थांच्या तस्करीत सतर्क होता.1995 साली परदेशात फरार झाल्यानंतर त्याने दुबईत आपले मोठे बस्तान बसविले होते. ऑगस्ट 2013 मध्ये आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, ईडीकडून झालेल्या चौकशीत इकबाल मिर्ची याच्या मुंबईतील संपत्तीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर कारवाई करण्यात येत आहे. मुंबईतील वरळीतील सिजे हाऊसच्या जागेवरून ईडीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती.