ETV Bharat / state

त्या 'देशविघातक' आमदारांना तात्काळ अटक करा - अतुल भातखळकर - BANGLADESH CITIZENS

बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदेशीर व देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. या 'देशविघातक कृत्य करणाऱ्या आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना तात्काळ अटक करा' अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

BANGLADESH CITIZENS
त्या देशविघातक आमदारांना तात्काळ अटक करा
author img

By

Published : Nov 2, 2020, 5:47 PM IST

मुंबई - बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीर रित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेले लेटरहेड जप्त केले आहेत. त्यावर बेकायदेशीर व देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. या 'देशविघातक कृत्य करणाऱ्या आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना तात्काळ अटक करा', अशी मागणी अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

त्या देशविघातक आमदारांना तात्काळ अटक करा
प्रकरण काय आहे?
मुंबईच्या साकीनाका पोलीसांनी आज अटक केलेल्या टोळीने एमआयएमचे आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांच्या लेटरहेडचा वापर करून मुंबईसह, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह भारतातील विविध शहरांमध्ये बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरिता बनावट सरकारी दस्तऐवज तयार करण्याचे काम सर्रासपणे करत होते. त्यांच्याकडे एमआयएमच्या या आमदारांची 7 कोरी लेटरहेड सुद्धा मिळाली आहेत. हा घातक व धोकादायक प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
यावर भारताचा बांगलादेश बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या या दोन्ही आमदारांना तात्काळ अटक करण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) द्यावा, अशी मागणी सुद्धा भातखळकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.