ETV Bharat / state

BMC Water Tariff: मुंबईकरांवर पाणीपट्टीवाढीची टांगती तलवार, आयुक्तांच्या निर्णयाकडे मुंबईकरांचे लक्ष - आयुक्तांच्या निर्णयाकडे मुंबईकरांचे लक्ष

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) पाणीपट्टीत ७.१२ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जलविभागातर्फे दहा ते बारा दिवसांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांनी या दरवाढीला मंजुरी दिल्यास मुंबईकरांवर पाणी दरवाढीचा बोजा पडणार आहे. मुंबई महापालिकीचे निवडणूक ( BMC Commissioner ) होणार असल्याने आता पालिका आयुक्त मुंबईकरांवर पाणीपट्टीच्या बोजा लादणार का?, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

BMC Mumbai
मुंबईकरांवर पाणीपट्टीवाढीची टांगती तलवार
author img

By

Published : Oct 30, 2022, 10:41 PM IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) पाणीपट्टीत ७.१२ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जलविभागातर्फे दहा ते बारा दिवसांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांनी या दरवाढीला मंजुरी दिल्यास मुंबईकरांवर पाणी दरवाढीचा बोजा पडणार आहे. मुंबई महापालिकीचे निवडणूक ( BMC Commissioner ) होणार असल्याने आता पालिका आयुक्त मुंबईकरांवर पाणीपट्टीच्या बोजा लादणार का?, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

या कारणामुळे पाणी पट्टीत वाढ - मुंबई महापालिकेने २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने अनुमती दिली होती. या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जाते. आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी शासनाला देण्यात येणारे पैसे, तसेच इतर देखभाल खर्च याची सर्व गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला जातो. कोरोनामुळे मागील दोन वर्ष पाणी पट्टी, मालमत्ता कर इतर करात पालिकेने वाढ केली नव्हती. मात्र मुंबईकरांना मिळणाऱ्या पाण्याचा दर्जा आणि उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा पाहिल्यास त्यासाठी आकारण्यात येणारे दर तुलनेने कमी आहे. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात. त्यासाठी होणारा खर्च जास्त आहे यामुळे पाणीपट्टीत दरवर्षी दरवाढ केली जाते.

पालिकेचा इतका खर्च वाढला - मुंबईत २०२० मध्ये कोरोनाच प्रसार झाल्याने पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी २०२१ ला ५.२९ टक्क्यांनी पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र कोरोना आणि पालिकेच्या निवडणुका असल्याने करवाढ करू नये, असे अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. यामुळे दरवाढ करण्यात आली नव्हती. आता पालिकेच्या जल विभागाचा आस्थापना खर्च ५१८ वरून ५७७ रुपयांपर्यंत वाढला आहे. तर प्रशासकीय खर्च १२५ रुपयांवरून घटून ८५ रुपये झाला आहे. विद्युत खर्च २२१ रुपयांवरून २२२ रुपये झाला आहे. तर सरकारी तलावांतून घेण्यात येणार्‍या पाण्याचा खर्च ८७ रुपयांवरून १०१ रुपये झाला आहे. तर इतर प्रचालन व परीरक्षण खर्च ८१ रुपयांवरुन १२०.४८ टक्के झाला म्हणजेच ४८.७४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे पाणी पाटी दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. आयुक्तांनी त्याला मंजुरी दिल्यास ही दरवाढ लागू होऊ शकते, अशी माहिती पालिकेच्या जलविभागाचे अभियंता पुरुषोत्तम मालवदे ( Water Department Engineer Purushottam Malwade ) यांनी दिली.

अशी होणार पाणी पट्टीत वाढ - मुंबई पालिकेने २०२२-२३ मध्ये पाणीपट्टीचा ७.१२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावानुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी ४.९३ रुपयांवरून ५.२८ रुपये होणार आहे. इमारतींची पाणीपट्टी ५.९४ रुपयांवरून ६.३६ रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी २३.७७ रुपयोवरून २५.२६ रुपये होणार आहे. व्यवसायिक विभागात ४४.५८ रुपयांवरून ४७.६५ रुपये होणार आहे. उद्योग कारखान्यांसाठी ५९.४२ रुपयांवरून ६३.६५ रुपये आणि रेसकोर्स व फाइव्ह स्टार हॉटेलसाठी ८९.१४ रुपयांवरून ९५.४९ इतकी पाणीपट्टी वाढणार आहे. दरम्यान, मलनिस्सारण प्रती एक हजार लिटर साठी ४.७६ रुपये आकारण्यात येणार आहे.

काँग्रेस करणार विरोध - मुंबईकरांना आधीच महागाईच्या झळा सहन कराव्या लागत असतानाच ही आणखी एक दरवाढ मुंबई महापालिका प्रशासनाकडून मुंबईकरांवर लादण्यात येत आहे. या दरवाढीला मुंबई कॉंग्रेसकडून विरोध करण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.