ETV Bharat / state

ATS Busts Illegal Call Center : एटीएसने केला अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश - अवैध सिम बॉक्ससह टेलिफोन एक्सचेंज

एटीएसने डोंगरी येथे बेकायदेशीर बोगस टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एटीएसने रियास मोहम्मद उर्फ पीके (वय ३२ वर्षे) याला बेड्या ठोकल्या आहेत. अवैध सिम बॉक्सच्या मदतीने टेलिफोन एक्सचेंज चालवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

ATS Busts Illegal Call Center
ATS Busts Illegal Call Center
author img

By

Published : Jul 26, 2023, 9:19 PM IST

मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपाडा युनिटने दक्षिण मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एटीएसच्या नागपाडा युनिटला चायना सिम बॉक्सचा वापर करून डोंगरी येथे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डोंगरी येथील एका ठिकाणी छापा टाकून अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रियाझ मोहम्मद उर्फ पीके (वय ३२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा केरळचा असल्याची माहिती एटीएसने दिली.

घरावर पोलिसांचा छापा : 25 जुलै रोजी अवैध सिम बॉक्सच्या मदतीने अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपाडा युनिटने DOT ( Department of Telecommunication)च्या अधिकाऱ्यांसह दोन सरकारी पंचानी डोंगरी येथे छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी रियास मोहम्मद (वय ३२) हा राहत असल्याचे आढळून आले. रियाझ मूळचा केरळचा आहे. छापा टाकलेल्या घराची कसून झडती घेतली असता, घराच्या पोटमाळ्यात सिमकार्ड असलेले एकूण चार सिम बॉक्स सापडले.

दहशतवादी कारवायांना मदत करणारे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त करून भविष्यात भारत सरकारच्या दूरसंचार विभागाची आर्थिक फसवणूक रोखण्यात आली - संतोष भालकर, नागपाडा युनिटचे प्रभारी

बेकायदेशीर कॉल सेंटर : त्या सिम बॉक्सेसची तपासणी केली असता 4 सिम बॉक्समध्ये एअरटेल कंपनीचे एकूण 149 सिमकार्ड आढळून आले. या कारवाईत एकूण 5 लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रियाझ मोहम्मद याने बांगलादेशात राहणारा त्याचा साथीदार अलमल याच्या मदतीने बेकायदेशीर कॉल सेंटरचे काम सुरू केले होते. रियाझने एका उपकरणाद्वारे परदेशातील आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतातील इच्छित मोबाइल क्रमांकावर बेकायदेशीरपणे राउट करून भारत सरकारच्या दूरसंचार विभागाची फसवणूक केली आहे.

आरोपी विरोधात गुन्हा दाखल : या प्रकरणी आरोपी रियाझ मोहम्मद विरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ३४, भारतीय टेलिग्राफ कायदा कलम ४, २०, २५ आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ कलम ३, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास डोंगरी पोलीस करत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एटीएसच्या नागपाडा युनिटने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - Pune Terrorist : पुण्यात दहशतवाद्यांनी रचला होता बॉम्बस्फोटाचा कट; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.