ETV Bharat / state

Mumbai Crime : सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या; नैराश्यामुळे उचलले टोकाचे पाऊल? - Assistant police inspector suicide

नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश काशीराम थेतले (वय 38 वर्षे) यांनी त्यांच्या चुनाभट्टी येथील राहत्या घरात शनिवारी मध्यरात्री दोन ते सकाळी आठ वाजताच्या सुमारास पत्नी झोपलेली असताना हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Crime
पोलीस निरीक्षकाने गळफास लावून केली आत्महत्या
author img

By

Published : Jan 29, 2023, 8:48 PM IST

Updated : Jan 30, 2023, 7:20 AM IST

मुंबई : पोलीस निरीक्षक असलेले प्रकाश खेतले हे आपल्या पत्नीकडे आत्महत्या करण्याबाबत वारंवार बोलत असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या प्रकरणी आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश थेतले हे चुनाभट्टी येथील चुनाभट्टी पोलीस वसाहतीतील समर्थ कृपा बिल्डिंगमध्ये पत्नीसह राहत होते. काल मध्यरात्री 1.57 ते सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात प्रकाश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

नैराश्यामुळे आत्महत्या ? मयत यांची पत्नी गीता थेतले (वय 31 वर्षे) यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून त्यांचे लग्न 2015 मध्ये प्रकाश थेतले यांच्यासोबत झाले होते. त्यांना अजून मूलबाळ नाही तसेच मयत प्रकाश यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ते सतत नैराश्यामध्ये असायचे आणि कामावर वारंवार गैरहजर राहत असत. आत्महत्या करण्याबाबत नेहमी पत्नीशी बोलणे होत असे. त्यांनी पत्नी बेडरूममध्ये झोपलेली असताना त्यांनी बेडरूमला बाहेरून कडी लावून हॉलमध्ये गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या त्यांचा कोणावरही संशय अथवा तक्रार नाही. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात पुढील विधीसाठी देण्यात आला असल्याची माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी दिली आहे.

कोर्ट परिसरात आत्महत्येचा प्रयत्न : मुंबई उच्च न्यायालयात 17 जून, 2022 रोजी शुक्रवारी पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक अनुचित प्रसंग टळला. एक व्यक्तीने न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या न्यायदानात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतले. या घटनेमध्ये वापरण्यात आलेले हत्यार सुरक्षा रक्षकाच्या नजरेतून उच्च न्यायलायाच्या परिसरात कसे आले?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. माजी सैनिक तुषार शिंदे ( वय, 55 ) असे या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव होते. तुषार शिंदे यांची वृद्ध आई-वडिलांविरोधात संपत्ती वादातून केस फाईल केली होती. ज्याचा निकाल आई-वडिलांच्या बाजूने लागला. त्यामुळे संपत्ती हातातून गेली या निराशेत तुषार शिंदे यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी न्यायालयाच्या परिसरातच धारदार हत्याराने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असेलल्या पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले आणि गंभीर घटना टळली.

हेही वाचा : Thane Crime : मित्रासोबत एकांतात वेळ घालवायला गेली अन् दोघांनी केला बलात्कार, 24 तासात आरोपी अटकेत

Last Updated : Jan 30, 2023, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.