मुंबई - निवडणुकांसाठीचे प्रचार संपून आता सर्वत्र मतदानाचे वेध लागले आहे. नवी मुंबईत २ मतदारसंघ असून, ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. नवी मुंबई शहर २१ तारखेला होणाऱ्या मतदानास सज्ज झाले असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.
नवी मुंबईतील २ मतदारसंघात विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. नवी मुंबईत 3 हजार ५०० पोलिसांसह ८०० होमगार्ड अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, या निवडणुकीवर पावसाचे सावट असल्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - मुंबई व उपनगरात आचारसंहिता कालावधीत १०.३६ कोटींची रक्कम जप्त
नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात ३९० मतदान केंद्र तर, ऐरोली मतदारसंघात ४४० मतदार केंद्र आहेत. त्यातील ८८ मतदान केंद्र संवेदनशिल म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. निवडणूक अधिकारी व कर्मचारी निवडणूकस्थळी दाखल झाले असून, सोमवारी होणाऱ्या मतदानावर पावसाचे सावट असल्याने सर्व स्तरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - मतदान करा फरक पडतो, मराठी सेलिब्रिटींचं मतदारांना आवाहन