ETV Bharat / state

'पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत, मीही राजीनामा द्यायला तयार'

लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेला पराभव लक्षात घेता त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नाही. आम्ही सर्वच त्यासाठी जबाबदार आहोत. त्यात महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी कोणावर दोष देत नाही, गरज पडल्यास मीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाण
author img

By

Published : May 25, 2019, 4:12 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेला पराभव लक्षात घेता त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नाही. आम्ही सर्वच त्यासाठी जबाबदार आहोत. त्यात महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी कोणावर दोष देत नाही, गरज पडल्यास मीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते आज मुंबईमध्ये बोलत होते.

अशोक चव्हाण बोलताना

वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला 9-10 जागांवर फटका बसला. लोकसभा विधानसभा विषय वेगळा, हेच विधानसभेत असणार नाही. वंचित भाजपची बी टीम असल्याचे मी वारंवार बोलत होतो, त्याचा फायदा भाजपालाच झाला, हे आता समोर आले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

राज्यात झालेल्या पराभवाची सर्वांची जबाबदारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, तरीही पराभव झाला असल्याने ज्या राज्यात पराभव झाला त्या राज्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यावेत. मी सुध्दा राजीनामा देण्यास तयार आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षाची नवी टीम बनवण्यास मोकळीक द्यावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात कसलीही धुसफुसत नाही. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले गेले. मात्र ज्या लोकांनी यादरम्यान पक्षविरोधी काम केलेल्यावर कारवाई करू, त्याचा अहवाल मागवला आहे, त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

Intro:

पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत; मीही राजीनामा द्यायला तयार- अशोक चव्हाण
मुंबई, ता. 25:

लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेला पराभव लक्षात घेता त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नाही.आम्ही सर्वच त्यासाठी जबाबदार आहोत. त्यात महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी कोणावर दोष देत नाही, गरज पडल्यास मीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत सांगितले.

वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला 9-10 जागांवर फटका बसला. लोकसभा विधानसभा विषय वेगळा..हेच विधानसभेत असणार नाही..
वंचित भाजपची बी टीम असल्याचे मी वारंवार बोलत होतो, त्याचा फायदा भाजपालाच झाला, हे आता समोर आले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

राज्यात झालेल्या पराभवाची सर्वांची जबाबदारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, तरीही पराभव झाला असल्याने
ज्या राज्यात पराभव झाला त्या राज्यातील पदाधिका-यांचे राजीनामे घ्यावेत मी सुध्दा राजीनामा देण्यास तयार आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षाची नवी टीम बनवण्यास मोकळीक द्यावी, असेही ते म्हणाले

कॉंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, त्यामुळे पक्षात कसलीही धुसफुसत नाही.सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले गेले, मात्र ज्या लोकांनी यादरम्यान पक्षविरोधी काम केलेल्यावर कारवाई करू, त्याचा अहवाल मागवला आहे, त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

Body:पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत; मीही राजीनामा द्यायला तयार- अशोक चव्हाणConclusion:पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत; मीही राजीनामा द्यायला तयार- अशोक चव्हाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.