ETV Bharat / state

Ashok Chavan On Maratha Movement : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण

Ashok Chavan On Maratha Movement : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यारून उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी काल लाठीचार्ज केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. (suppress Maratha movement) दरम्यान कॉंग्रेसचे नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मराठा आंदोलन दडपण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे. (Shashan Aaplya Dari Program)

Ashok Chavan On Maratha Movement
अशोक चव्हाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 8:15 PM IST

मराठा आंदोलनावरील लाठीचार्जविषयी अशोक चव्हाणांचे मत

मुंबई Ashok Chavan On Maratha Movement : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यारून उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी काल लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण लागले. राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. (suppress Maratha movement) अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते अंतरवली सराटी गावात जाऊन आंदोलकांच्या भेटी घेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे, शासनाने कार्यक्रमासाठी मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Shashan Aaplya Dari Program)

आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू : राज्य सरकारच्या वतीने सध्या राज्यभर शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. 8 सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी जालना जिल्ह्यात होणार आहे. अंतरवली सराटी मराठा आंदोलनाचा फटका शासन आपल्या दारी कार्यक्रमाला बसू नये म्हणून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते. पोलिसांकडून लाठीहल्ला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून रबरी बुलेटचा देखील वापर करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलकांनी काहीतरी केलं म्हणूनच लाठीहल्ला केल्याची भूमिका राज्य सरकार घेऊ पाहत आहे. तसंच या आंदोलनाला हिंसक वळण देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न देखील काही मंडळींनी सुरू केला आहे.

संसदेत घटना दुरुस्ती करा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनने कोणतीही ठोस पावले उचलली नाही. फक्त खोटं बोलून झुलवत ठेवायचं, गाजर दाखवायचं अशा प्रकारचे काम राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करणं गरजेचं असून त्यासाठी घटना दुरुस्त करणं गरजेचं असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. Raj Thackeray On Unemployment Issue : प्रश्न फक्त मराठा तरुण-तरुणींचा नाही एकूणच मराठी जनतेचा आहे - राज ठाकरे
  2. Ajit Pawar On Lathicharge : राज्यसरकार आंदोलकांच्या भावनांशी सहमत, अजित पवारांनी दिले दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
  3. Prithviraj Chavan On Lathicharge : आंदोलन दडपण्याचा आदेश मुंबईतूनच - पृथ्वीराज चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.