ETV Bharat / state

Ashish Shelar : आशिष शेलार यांची पालिका आयुक्तांकडे नालेसफाईची मागणी; त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेमणूकीचा सल्ला - Ashish Shelar demand tender

आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांकडे नालेसफाई करण्यासाठी निविदा काढण्याची ( Ashish Shelar demand Municipal Commissioner for drain cleaning ) मागणी केली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना त्याबाबतचे पत्र लिहिले आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना यात घेऊन असे त्यांनी म्हटले ( Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Jan 7, 2023, 1:42 PM IST

मुंबई : मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली जाते. गेल्या वर्षी मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या निविदा उशिरा काढल्याने कामावर परिणाम झाला होता. यावर्षीही मोठ्या नाल्याच्या सफाईच्या निविदा अद्याप काढल्या नसल्याने नालेसफाईच्या कामाला उशीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून या निविदा तातडीने काढण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी तातडीने लक्ष द्यावे ( Ashish Shelar demand Municipal Commissioner for drain cleaning ) अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष तथा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली ( Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) आहे.

नालेसफाईच्या निविदा : आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात पावसाळ्या पुर्वी दरवर्षी मुंबईतील सुमारे 309 मोठ्या नाले, 508 छोटे नाले, 5 नद्या आणि रस्त्या लगतची छोटी गटारे यातील गाळ काढण्याची कामे करावी ( Demand tender for drain cleaning ) लागतात. साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिल पासून पुर्ण क्षमतेने नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली तरच ती कामे वेळेत पुर्ण होतात, असे आजपर्यंतच्या कार्यपध्दतीवरुन दिसून आले आहे असे शेलार यांनी म्हटले आहे.

निविदा प्रक्रियेला उशीर : यावर्षी अद्याप नालेसफाईच्या कंत्राटाच्या निविदाच काढण्यात आलेल्या नाहीत. जर ही निविदा प्रक्रिया वेळीच पुर्ण न झाल्यास प्रत्यक्ष कामे वेळीच सुरु होणार नाहीत. गतवर्षी अशा प्रकारे निविदा प्रक्रिया उशिरा सुरु झाली होती. त्यावेळी ही आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर विलंबाने प्रक्रिया सुरु झाली खरी मात्र त्याचा कामांवर परिणाम झाला होता. गतवर्षीचा अनुभव लक्षात न घेता पुन्हा याही वर्षी प्रशासनाने निविदा प्रक्रियेला उशीर केल्याचे दिसून येते आहे. ही बाब गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. असे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्रातील इतर मागण्या : ज्या पध्दतीने छोट्या नाल्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. तशीच मोठ्या नाल्यांच्या कामांची निविदा तातडीने काढण्यात याव्यात. निविदा प्रक्रिया पारदर्शक असावी. मागितल काळात काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना यामध्ये ( Blacklisted contractors ) समावेश करण्यात येऊ नये. निविदेपासून साफसफाईपर्यंत संपूर्ण कामांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा असे त्यांनी म्हटले आहेत. कामे वेळेत सुरु व्हावीत, यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, गाळ संपूर्ण काढला जाईल या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.