ETV Bharat / state

'...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरशांमध्ये किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा'

author img

By

Published : Feb 2, 2020, 1:35 PM IST

Updated : Feb 2, 2020, 4:24 PM IST

या प्रशिक्षणाबाबत फेरविचार व्हावा, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. रजा अकादमीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांनी 'रामभाऊ म्हाळगी'प्रबोधिनीतील प्रशिक्षण रद्द करणे वैचारिक दिवाळखोरी असल्याचा आरोप शेलार यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

Ashish shelar
आशिष शेलार, भाजप नेते

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाईंदरच्या 'रामभाऊ प्रबोधिनी'मधील मुंबई विद्यापीठातील ३० अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शनिवारी अर्ध्यावर रोखण्यात आले. यावर आज भाजपकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. 'म्हाळगीमधील प्रशिक्षण नको असेल, तर सरकारी प्रशिक्षणे एक तर मदरशांमधे किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा, अशी टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केली आहे.

TWEET
आशिष शेलारांचे ट्वीट

हेही वाचा - अर्थसंकल्पाकडून 'आरएसएस'ला काय हवं? पाहा...

या प्रशिक्षणाबाबत फेरविचार व्हावा, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. रजा अकादमीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांनी 'रामभाऊ म्हाळगी'प्रबोधिनीतील प्रशिक्षण रद्द करणे वैचारिक दिवाळखोरी असल्याचा आरोप शेलार यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

हेही वाचा - संघाच्या प्रबोधिनीकडून मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, सातव यांचा आक्षेप

'मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेत ते तातडीने रद्द केले. ही बाब अत्यंत खेदजनक असून पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक अस्पृश्यता दाखवून देणारी आहे. वैचारिक अस्पृश्यतेसोबत जागेची अस्पृश्यताही आता मानत असाल, तर विधानसभेत ज्या बाकांवर आपण सत्ताधारी म्हणून बसला आहात त्याच जागेवर संघ विचारांचे आम्ही सगळे यापूर्वी बसलो होतो. त्यामुळे ती बाकेही हवी तर धुवून, पुसून घ्या. ज्या काँग्रेसच्या माजी खासदारांनी ही वैचारिक अस्पृश्यता दाखवली त्यांना सरकारतर्फे वैचारिक दिवाळखोरीचा पुरस्कार द्या,' अशी टीका पत्रामध्ये करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचा निषेध करत असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले.

LETTER
या प्रशिक्षणाबाबत फेरविचार व्हावा, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.

हेही वाचा - माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; महिला तहसीलदाराला म्हणाले...

Intro:...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरश्यांमधे किंवा बार आणि रेस्टॉरंट मधे ठेवा... - आशिष शेलार

mh-mum-01-mhalagi-trai-shelar-letter-7201153

मुंबई, ता.२
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामभाऊ प्रबोधिनीतील मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण काल अर्ध्यावर रोखण्यात आले. त्यावर आज भाजपकडून जोरदार आक्षेप घेण्यात आले आहेत. भाजप नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यापुढे म्हाळगी मधील प्रशिक्षण नको असेल तर सरकारी प्रशिक्षणे एक तर मदरश्यांमधे घ्या किंवा बार आणि रेस्टॉरंट मधे ठेवा, अशी टीका केली आहे.

भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये मुंबई विद्यापीठातील 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण काल अर्ध्यावरच रोखण्यात आले. त्याची दखल घेत भाजपा नेते अशिष शेलार यांनी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याविषयी फेरविचार करावा अशी विनंती केली आहे.
रजा अकादमीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांनी मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे रामभाऊ म्हाळगी येथील प्रशिक्षण रद्द केले ही वैचारिक दिवाळखोरी ही असल्याचा आरोपही केला असल्याचे एक ट्विट ही शेलार यांनी केले आहे. तर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. एक दिवस प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर तातडीने सदर प्रशिक्षण रद्द करण्यात आले. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक अस्पृश्यता दाखवून देणारी आहे.यापुढे सरकारी प्रशिक्षणे एक तर मदरश्यांमधे घ्या किंवा बार आणि रेस्टॉरंट मधे ठेवा... उरला प्रश्न वैचारिक अस्पृश्यतेसोबत जागेची अस्पृश्यता ही आता मानत असला तर विधानसभेत ज्या बाकांवर आपण सत्ताधारी म्हणून बसला आहात त्याच जागेवर संघ विचारांचे आम्ही सगळे यापूर्वी बसलो होतो. त्यामुळे ती बाकं ही हवे तर धुवून पुसून घ्या. ज्या काँग्रेसच्या माजी खासदारांनी ही वैचारिक अस्पृश्यता दाखवली त्यांना सरकारतर्फे वैचारिक दिवाळखोरीचा पुरस्कार द्या, अशी टीका केली आहे.
एक प्रशिक्षण झाले नाही तर प्रबोधिनीचे मोठे नुकसान होणार आहे. म्हणून ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिलेली नाही, तर काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरिचा आणि सरकारच्या वैचारिक अस्पृश्यतेचा आम्ही निषेद आपल्याकडे या पत्राव्दारे नोंदवित आहोत असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.Body:...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरश्यांमधे किंवा बार आणि रेस्टॉरंट मधे ठेवा... - आशिष शेलारConclusion:
Last Updated : Feb 2, 2020, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.