मुंबई - राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. या टीकेला लगेचच भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी 30 तारखेला आपणच बहुमत सिद्ध करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना शेलार म्हणाले, आम्ही तर सकाळी सहाच्या शाखेत जाणारे स्वंयसेवक आहोत. त्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम सकाळी राम प्रहाराच्यावेळी घेण्यात आला असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी घाणेरड्या भाषेत बोलायला मी राऊत नाही, असे म्हणत संजय राऊतांवर टीका केली. याबरोबरच 30 तारखेला आपणच बहुमत सिद्ध करू, आमच्याकडे शिवसेनेशिवाय 170 आमदारांचे संख्याबळ आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तसेच शपथविधीची वेळ रामप्रहराची वेळ होती. मात्र, शिवसेना रामासाठी अयोध्येला जाणार होती. पण सत्ता स्थापनेसाठी शिवसेना रामाला विसरली आहे, असे वक्तव्य शेलार यांनी केले आहे.