मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती वैद्य आहे. मात्र, राष्ट्रवादीने नवीन नियुक्तीच्या आधारे दावा केला आहे. तरी अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यांचाच व्हीप सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना बंधनकारक आहे, असे भाजपचे आशिष शेलार यांनी सांगितले.
आज सर्वोच न्यायालायच्या आदेशामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की आजच्या आज फ्लोअरवर जाण्याची गरज नाही. त्यामुळे या निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तोंडावर आपटली आहे. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम आता आटोपला आहे. आजच्या आज फ्लोअर टेस्ट घ्यावी, याबाबत न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. अजित पवार यांना देखील स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी न्यायालयाने दिली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी संवैधानिक पदांना बदनाम करण्याचे काम करत आहेत.
राष्ट्रपती आणि राज्यपाला यांना बदनाम करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. स्वतः लोकशाहीची घोषणा करायची आणि स्वतःच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत सिद्ध करेल.