ETV Bharat / state

खबरदारी म्हणून रेशन घेताना ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा द्यायचा नाही - E pause machine

राज्यात अनेक जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली आहे. अन्न धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकांनामध्ये शिक्षक तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ दिली.

chhagan bhujbal
खबरदारी म्हणून रेशन घेताना ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा द्यायचा नाही
author img

By

Published : May 5, 2020, 8:25 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना मार्च आणि एप्रिलमध्ये ई-पॉस प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारच्यावतीने नव्याने ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेत राज्यात या महिन्यापासून मिळणाऱ्या रेशनसाठी अंगठा देणे गरजेचे नाही, असे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राज्यात अनेक जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली आहे. अन्न धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकांनामध्ये शिक्षक तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत वाटप होत असलेल्या लाभार्थ्यांचा ई पॉस मशीनवर अंगठा घेण्यात येतो. ई पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा देतांना व वाटप करणाऱ्या दुकानदारांचा जवळून संपर्क येत असल्याने कोरोनाचा संसर्ग तसेच संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. ई पॉसवर अंगठा घेतांना सोशल डिस्टंन्स पाळणे खूप कठीण होईल व संसर्ग होण्याचा धोका खूप वाढू शकतो. या अनुषंगाने धान्य घेण्याकरीता येणाऱ्या शिधापत्रिकाधारक यांचा मशिनवर अंगठा न घेता त्यांचा रेशनकार्ड नंबर घेण्याची रास्त भाव दुकानदारास मुभा देण्यात आली आहे.

chhagan bhujbal
खबरदारी म्हणून रेशन घेताना ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा द्यायचा नाही
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बघता रेशन दुकानदार व लाभार्थी यांना सदर प्रणालीचा वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे राज्यशासनाच्या वतीने मे महिन्यात धान्य वाटप करतांना ई पॉस प्रणाली अट शिथिल करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला आहे. तसेच रेशनचे वाटप करतांना शिक्षक किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्याच्या मदतीने रेशन दुकानांमध्ये अन्नधान्याचे वाटप योग्य पद्धतीने होत आहे की नाही याबाबतही लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप स्वस्त धान्य दुकानांवर शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नसेल त्या जिल्हा प्रशासनाने अशा प्रकाराच्या नेमणुका करून आपल्या जिल्ह्यातील रेशन दुकांनामध्ये अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले असल्याचेही मंत्री भुजबळ म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.