ETV Bharat / state

भारतीय जैन संघटनेचा पोलिसांसाठी उपक्रम, मोफत कोरोना टेस्टसह रुग्णवाहिकांची व्यवस्था

राज्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीसाठी भारतीय जैन संघटनांनी पुढाकार घेतला आहे. आज बोरीवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्यात पोलिसांची थर्मल स्क्रीनिंग केली गेली. तसेच कोरोना स्वॅब टेस्टही घेण्यात आल्या.

 free corona test for police
भारतीय जैन संघटनेचा पोलिसांसाठी उपक्रम,
author img

By

Published : May 31, 2020, 10:09 PM IST

मुंबई - कोरोना महामारीच्या काळात पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात राज्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय तपासणीसाठी भारतीय जैन संघटनांनी पुढाकार घेतला आहे. डॉक्टर आपल्या दारी या रुग्णवाहिकेच्या संकल्पनेतून भारतीय जैन संघटना महाराष्ट्रात 500 रुग्णवाहिका चालवत आहे.

या पाचशे रुग्णवाहिकांपैकी मुंबईत 59 रुग्णवाहिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकेने आज बोरीवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्यात पोलिसांची थर्मल स्क्रीनिंग केली गेली. तसेच कोरोना स्वॅब टेस्टही घेण्यात आल्या. लवकरच ही मोहीम सर्व पोलीस ठाण्यात राबवण्यात येणार असल्याचे या मोहिमेच्या समन्वयक डॉ. निलू जैन यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.