ETV Bharat / state

'लॉकडाऊन'मध्ये ७३ लाख ग्राहकांकडून वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा - electricity bill news

सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रदेखील बंद आहेत. मात्र, वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

'लॉकडाऊन' मध्ये ७३ लाख ग्राहकांकडून वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा

author img

By

Published : Apr 7, 2020, 7:36 AM IST

मुंबई - राज्यात कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर 'लॉकडाऊन' असताना महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत 73 लाख 29 हजार ग्राहकांनी मार्च महिन्याचा ऑनलाइन वीजभरणा केला आहे. वीजग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १२२७ कोटी २५ लाख रुपयांचे 'ऑनलाईन' वीजबिल भरले असून यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडळातील १३ लाख ५० हजार ग्राहक आहेत. तर, मुंबईतील भांडूप परिमंडळातील 11 लाख वीजग्राहकांचा यात समावेश आहे. महावीतरणकडे राज्यात 2 कोटी 50 लाख ग्राहक आहेत. या ग्राहकसंख्येच्या तुलनेत ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या अगदी कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, अन्य ग्राहकांनीही ऑनलाईन भरणा करावा यासाठी महावितरण प्रयत्नशील राहणार आहे.

सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रदेखील बंद आहेत. मात्र, वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

'लॉकडाऊन'मुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र, मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी 'ऑनलाईन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. नेट बँकिगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे.

परिमंडलनिहाय ग्राहकसंख्या व रक्कम पुढीलप्रमाणे -

पुणे : ग्राहक - १३.५० लाख, २६६.२९ कोटी, भांडूप – ग्राहक - १०.९९ लाख, २३३.६० कोटी, कल्याण –ग्राहक - १०.२५ लाख, १६४.३९ कोटी, नाशिक – ग्राहक - ५.६५ लाख, ९४.४१ कोटी, बारामती – ग्राहक - ५.६३ लाख, ७१.०९ कोटी, कोल्हापूर – ग्राहक - ४.२२ लाख, ८४.९६ कोटी, नागपूर - ग्राहक - ४.०५ लाख, ७०.७५ कोटी, जळगाव - ग्राहक - ३.२५ लाख, ४७.८७ कोटी, औरंगाबाद – ग्राहक - २.३० लाख, ४३.७५ कोटी, अकोला –ग्राहक - २.२७ लाख, २७.१० कोटी, अमरावती - ग्राहक - २.२१ लाख, २३.४८ कोटी, लातूर - ग्राहक - १.९२ लाख, २५.५३ कोटी, कोकण -ग्राहक - १.८८ लाख, २२.९२ कोटी, चंद्रपूर -ग्राहक - १.७९ लाख, १५.३६ कोटी, गोंदिया - ग्राहक - १.७९ लाख, १२.८२ कोटी, नांदेड - ग्राहक - १.५८ लाख, २२.९१ कोटी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.