ETV Bharat / state

तिढा जालना मतदारसंघाचा : अर्जून खोतकर 'मातोश्री'वर दाखल, दानवे-खोतकर होणार दिलजमाई ?

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर अनेक दिवसांपासून दंड थोपटून तयार आहेत.

अर्जून खोतकर
author img

By

Published : Mar 16, 2019, 3:12 PM IST

मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली आहे. दोन्ही पक्षात जागावाटप निश्चित झाले आहे. पण, जालना मतदारसंघात उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसेना नेते अर्जून खोतकर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा भाजपला सुटल्याने ते नाराज आहेत. हा तिढा सोडविण्यासाठी खोतकरांना उध्दव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवले आहे.

अर्जून खोतकर

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर अनेक दिवसांपासून दंड थोपटून तयार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा चंग त्यांनी बांधला होता. पण, अचानक राजकीय वारे फिरले. भाजप शिवसेनेत युतीची घोषणा झाली. ही जागा भाजपला सुटली. तरीही खोतकर निवडणूक लढण्यासाठी अडून बसले आहेत.

काही दिवसांपूर्वी दानवे यांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पण, खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेलाही अधूनमधून तोंड फुटत असते. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी खोतकर काँग्रेसला मदत करतील असे वक्तव्य केले होते. त्यामुळे खोतकरांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे

आज उद्धव ठाकरे यांनी खोतकरांना चर्चेसाठी बोलावले आहे. मराठवाडा समन्वयक म्हणून पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत. या चर्चेतून काही तोडगा निघेल का यावर विशेषतः जालना मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. खोतकरांचे बंड शमविण्यात शिवसेना यशस्वी नाही झाली तर जालन्यात युतीच्या जागेला नुकसान पोहोचू शकते.

Intro:Body:MH_Shivsena_AKhot_PmundeVisuals16.3.19
राज्यमंत्री अर्जून खोतकर मातोश्रीवर दाखल

जालना मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी हालचाली, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मातोश्रीवर बोलावणं, अर्जुन खोतकर आणि उद्धव ठाकरेंची भेट सुरु आहे.

राज्यमंत्री अर्जून खोतकर मातोश्रीवर दाखल

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, या भेटीत निवडणुकांबाबत एखादा महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खोतकर जालन्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत आग्रही असल्याने ही भेट महत्वाची मानली जाते.

खोतकर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर जालन्यातील जागेबाबतचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सेना-भाजप युतीनंतर रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्यापैकी नक्की कोण जालन्यातून निवडणूक लढवणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठीच ही भेट असल्याचं बोललं जात आहे.
अर्जून खोतकर यांच्या पाठोपाठ भाजप नेत्या पंकजा मुंडे मातोश्रीवर... जालना लोकसभा मतदारसंघातील युतीतील वाद सोडवण्यासाठी पंकजा मुंडे मराठवाडा समन्वयक म्हणुन मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.