ETV Bharat / state

वाट पाहावी लागणार नाही, आता अ‌ॅप सांगेल बेस्ट बस कधी येणार! - Mumbai

मुंबईची दुसरी लाईफलाईन सध्या आर्थिक अडचणीत आली आहे. यामुळे रस्त्यावर कमी बसेस उतरवल्या जात आहेत. यामुळे तासन् तास प्रवाशांना बसची वाट बघावी लागत असल्याने प्रवाशी बेस्टपासून दुरावला होता. याचा फटका बेस्टला बसला. यामुळे प्रवाशांची संख्या ४३ लाखांवरुन २० लाखांवर आली होती. तसेच बेस्टला रोज मिळणारे उत्पन्नही कमी झाले होते. या सगळ्या समस्यांना लक्षात घेऊन आता बेस्टची बस कधी येईल, याची माहिती प्रवाशांना देता येईल, यासाठी एक अ‌ॅप बनवले आहे.

बेस्ट बस : प्रवाशांच्या सुविधेसाठी अॅप लाँच
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:51 PM IST

मुंबई - मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हणून 'बेस्ट बस'ची ओळख आहे. मात्र, या बसेस बस स्थानकावर कधी येथील याची नेमकी माहिती कोणी देऊ शकत नाही. तर रस्त्यावरील ट्राफिक आणि आर्थिक घाटा, कमी प्रमाणात काढण्यात येणाऱ्या बसेस यामुळे प्रवाशांना तासन् तास बसची वाट बघावी लागत होती. मात्र, आता बेस्टची बस कधी येईल, याची माहिती प्रवाशांना देता येईल. यासाठी एक अ‌ॅप बनवले आहे. या अ‌ॅपचे सादरीकरण आज (शनिवारी) बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले.

प्रवाशांची समस्या लक्षात घेता बेस्टने अॅप लाँच केले.

मुंबईची दुसरी लाईफलाईन बेस्ट सध्या आर्थिक अडचणीत आली आहे. यामुळे रस्त्यावर कमी बसेस उतरवल्या जात आहेत. यामुळे तासनतास प्रवाशांना बसची वाट बघावी लागत असल्याने प्रवाशी बेस्टपासून दुरावला होता. याचा फटका बेस्टला बसला होता. यामुळे प्रवाशांची संख्या ४३ लाखांवरुन २० लाखांवर आली होती. तसेच बेस्टला रोज मिळणारे उत्पन्नही कमी झाले होते. बेस्ट आर्थिक घाट्यात असल्याने मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मागण्यात आली. पालिकेने सुचवलेल्या सुधारणांमध्ये प्रवाशांना नेमकी बस कधी येणार याचा कालावधी समजण्यासाठी अॅपचा वापर करावा असे सुचवण्यात आले होते. त्यानुसार बेस्टने अॅप लाँच केले आहे.

हेही वाचा - बेस्ट कामगारांचे मतदान घेऊन ठरवणार संपाची दिशा - शशांक राव

बेस्टने आपल्या गाड्यांचा नेमका वेळ समजावा, म्हणून व्हीकल ट्रेकिंग सिस्टमच्या आधारावर आपले अ‌ॅप सुरु केले आहे. यासाठी इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस)चे सादरीकरण बेस्ट समितीला करण्यात आले. या आयटीएमएस सिस्टमचे कमांड सेंटर बेस्टच्या वडाळा स्थानकावर येथे असणार आहे. प्रत्येक बसमध्ये जीपीएस सिस्टम बसवली जाणार आहे. त्यामधील सिग्नलद्वारे प्रवाशांना बस नेमकी किती वेळात पोहचेल, याची माहिती मिळणार आहे. या अॅपमध्ये बसस्थानकावर आल्यावर अलार्म वाजण्याची सुविधा आहे. बसमध्ये प्रवाशांची एखादी वस्तू राहिल्यास या अ‌ॅपवरुन प्रवाशांना तक्रारही करता येणार आहे.

तसेच बेस्टचे दिवसभरातील वेळापत्रक, बस स्थानक कुठे आहे, आदी माहिती या अ‌ॅपवर प्रवाशांना मिळणार आहे. मुंबईत ट्रॅफिकची समस्या आहे. यामुळे रिअल टाइम लोकेशनचा उपयोग होणार नसल्याने हे अ‌ॅप गुगलच्या क्राउड डाटाशी संलग्न करावे, अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे.

हेही वाचा - उपनगरात बेस्ट बसला लावण्यात आल्या लोखंडी जाळ्या; बेस्टला नुकसानीची धास्ती

२०० डिजिटल बोर्ड -

बेस्ट उपक्रमाच्या ६ हजार बस थांब्यांपैकी २०० ठिकाणी डिजिटल बोर्ड बसवण्यात येणार आहेत. या बोर्डावर बस येण्याची अपेक्षित वेळ प्रवाशांना दिसणार आहे. बस कधी येणार, याची माहिती मिळावी म्हणून जिओ टॅगिंग केले जाणार आहे.

Intro:मुंबई - मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन बेस्ट बस आहे. या बसेस बस स्टॉपवर कधी येथील याची नेमकी माहिती कोणाचं देऊ शकत नाही. रस्त्यावरील ट्राफिक आणि आर्थिक घाट असल्याने रस्त्यावर कमी प्रमाणात काढण्यात येणाऱ्या बसेस यामुळे प्रवाशांना तासनतास बसची वाट बघावी लागत होती. मात्र आता बेस्टने बस कधी येईल याची माहिती प्रवाशांना देता येईल यासाठी एक ऍप बनवले आहे. या ऍपचे सादरीकरण आज बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले.
Body:मुंबईची दुसरी लाईफलाईन सध्या आर्थिक अडचणीत आली आहे. यामुळे रस्त्यावर कमी बसेस उतरवल्या जात आहेत. यामुळे तासनतास प्रवाशांना बसची वाट बघावी लागत असल्याने प्रवाशी बेस्टपासून दुरावला होता. याचा फटका बेस्टला बसला होता. प्रवाशांची संख्या ४३ लाखावरून २० लाखावर आली होती. यामुळे बेस्टला रोज मिळणारे उत्पन्नही कमी झाले होते. बेस्ट आर्थिक घाट्यात असल्याने मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मागण्यात आली. पालिकेने सुचवलेल्या सुधारणांमध्ये प्रवाशांना नेमकी बस कधी येणार याचा कालावधी समजण्यासाठी ऍपचा वापर करावा असे सुचवण्यात आले होते. त्यानुसार बेस्टने ऍप लॉंच केले आहे.

बेस्टने आपल्या गाड्यांचा नेमका वेळ समजावा म्हणून व्हीआयकल ट्रेकिंग सिस्टमच्या आधारावर आपले ऍप सुरु केले आहे. यासाठी इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस)चे सादरीकरण बेस्ट समितीला करण्यात आले. या आयटीएमएस सिस्टमचे कमांड सेंटर बेस्टच्या वडाळा डेपो येथे असणार आहे. प्रत्येक बसमध्ये जीपीएस सिस्टम बसवली जाणार असून त्यामधील सिग्नल द्वारे प्रवाशांना बस नेमकी किती वेळात पोहचेल याची माहिती मिळणार आहे. या ऍपमध्ये बसस्टॉप आल्यावर अलार्म वाजण्याची सुविधा आहे. बसमध्ये प्रवाशांची एखादी वस्तू राहिल्यास या ऍपवरून प्रवाशांना तक्रारही करता येणार आहे. बेस्टचे दिवसभरातले वेळापत्रक, बस डेपो कुठे आहे आदी माहिती या ऍपवर प्रवाशांना मिळणार आहे. मुंबईत ट्रॅफिकची समस्या आहे. यामुळे रिअल टाइम लोकेशनचा उपयोग होणार नसल्याने हे ऍप गुगलच्या क्राउड डाटाशी संलग्न करावे अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे.

२०० डिजिटल बोर्ड -
बेस्ट उपक्रमाच्या ६ हजार बस थांब्यांपैकी २०० ठिकाणी डिजिटल बोर्ड बसवण्यात येणार आहेत. या बोर्डावर बस येण्याची अपेक्षित वेळ प्रवाशांना दिसणार आहे. बस कधी येणार याच माहिती मिळावी म्हणून जिओ टॅगिंग केले जाणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.