ETV Bharat / state

MD Drugs Seized : अमली पदार्थ विरोधी पथकाने 60 लाखांचे एमडी ड्रग्स केले जप्त, दोघांना अटक - मेफेड्रॉन

आज दुपारी भायखळ्यातील मदनपुरा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वांद्रे परिसरातुन ६० लाखांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच कलम 8 (सी) सह 22 (क), 29 एम.डी.पी. एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MD Drugs Seized
MD Drugs Seized
author img

By

Published : Mar 11, 2023, 7:37 PM IST

मुंबई : ६० लाखांचे एमडी ड्रग्स प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मोठी कारवाई केली आहे. आज दुपारी भायखळा येथील मदनपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कलम ८ (क) सह २२ (क), २९ एम.डी. पी. एस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ६० लाखांचे एमडी ड्रग्स देखील जप्त करण्यात आले आहे. मदनपुरा येथे केलेल्या कारवाईत पहिल्या आरोपीकडुन १०० ग्रॅम, दुसऱ्या आरोपीकडुन २०० ग्रॅम वजनाचा "मेफेड्रॉन (M.D.)" हा अंमली पदार्थ एकुण ३०० ग्रॅम वजनाचा "मेफेड्रॉन (M.D.)" हा ६० लाख किंमतीचा आहे.

60 लाख किमतीचे ड्रग जप्त : अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने या परिसरात गस्त घालत असताना, मुंबई शहरातील अमली पदार्थ तस्करांना पकडण्यात यश आले आहे. अमली पदार्थांची विक्री विक्रेत्यांवरकडे प्रत्येकी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सापडले आहे. त्या दोघांविरोधात वांद्रे युनिट गुन्हे शाखा, मुंबई यांनी कलम 8(सी) सह 22(सी), 29 एमडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या ड्रगची किंमत 60 लाख आहे.

अंमली पदार्थ विरोधी सेलकडून सखोल तपास : अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पहिला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपाडा पोलीस ठाण्यात कलम 8 (c) 22. N. D. P. S. Act 1985 2) आणि कलम 8 (c) सह 22, 29 एन. D.P.S. Act-1985 दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी मुंबई शहर आणि उपनगरातील तरुणांना 'मेफेड्रोन (M.D)' या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या संदर्भात वांद्रे युनिट, अंमली पदार्थ विरोधी सेलकडून सखोल तपास केला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे (अति. कार्यभार), सहा. पोलीस आयुक्त किरण लोंढे (अति, कार्यभार) अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षांने केली आहे.

हेही वाचा - Nitin Gadkari On Palkhi Marg : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.