ETV Bharat / state

Malegaon Blasts Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर; आतापर्यंत 32 साक्षीदार पलटले

विशेष NIA न्यायालयात मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक साक्षीदार आज(31 मार्च) फितूर झाला आहे. साक्षीदाराने सांगितले की, एटीएसला दिलेल्या जबाबातील बहुतांश गोष्टी त्याला आठवत नाहीत. हा साक्षीदार मध्यप्रदेशातील एका हॉटेलमध्ये कामाला होता, जेथे मालेगाव बॉम्बस्फोटापूर्वी आरोपींनी खोल्या बुक केल्या होत्या. फितूर होणारा हा 32 वा साक्षीदार आहे.

FILE PHOTO
फाईल फोटो
author img

By

Published : Mar 31, 2023, 4:17 PM IST

मुंबई - मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाची आज सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात झाली. यावेळी या प्रकरणातला 32 वा साक्षीदार फितूर झाला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या सुनावणीत तब्बल 31 साक्षीदार फितूर झाले होते. त्यात आज आणखी एक भर पडली असून, 32 वा साक्षीदारही फितूर झाला आहे. हा साक्षीदार मध्यप्रदेशातील एका हॉटेलमध्ये त्याकाळी कामाला होता.

  • Another witness turned hostile in Malegaon 2008 blasts case in Special NIA court. The witness said that he doesn't recollect most of the things in his statement given to ATS. This witness was employed with a hotel in MP where accused had booked rooms sometime before the Malegaon…

    — ANI (@ANI) March 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

32 वा साक्षीदर फितूर - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. यात प्रकरणातील अनेक साक्षीदार आतापर्यंत फितूर झाले आहेत. मागील आठवड्यातच 31 वा साक्षीदार फितूर झाला होता. तर आज(31 मार्च) 32 वा साक्षीदार फितूर झाला आहे. एटीएसला दिलेल्या जबाबाबद्दल मला काहीच आठवत नाही, असे या साक्षीदाराने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे तोही आता फितूर झाला आहे.

साक्षीदार होता हॉटेलवर कामाला - मिळालेल्या माहितीनुसार, 32 वा साक्षीदार हा मध्यप्रदेशमधील एका हॉटेलवर कामाला होता. मालेगाव बॉम्बस्फोट घड़वण्यात आला त्याआधी आरोपींनी याच हॉटेलमध्ये रुम बुक केल्याची माहिती मिळत आहे. तोच साक्षीदार आता याप्रकरणी फितूर झाला आहे.

साक्षीदार होतायेत फितूर - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अनेक साक्षीदार आतापर्यंत फितूर झाले असल्याचे विविध सुनावणीदरम्यान समोर आले आहे. आतापर्यंत एकूण 32 साक्षीदार फितूर झाले आहेत. मी आरोपीला ओळखत नाही, मला याबद्दल काही आठवत नाही, मला याची माहितीच नाही, असे विविध कारणे देत साक्षीदार फितूर होत असल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण - 29 सप्टेंबर 2008 या दिवशी मालेगावमध्ये स्फोट घडवून आला होता. नमाजानंतर मशिदीबाहेर हा भयावह स्फोट करण्यात आला होता. याबॉम्बस्फोटात अनेकांचे प्राण गेले होते, तर अनेकजण जखमी झाले होते. याप्रकरणाची सुनावणी आताही न्यायालयात सुरू असून, अनेक साक्षीदार फितूर होत आहेत. याप्रकरणी ATS ने प्राथमिक तपास पूर्ण केला असून, त्यानंतर तीन वर्षांनंतर म्हणजेच 2011 मध्ये हे प्रकरण NIA संस्थेला ला वर्ग केले होते.

हेही वाचा - Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर पाकिस्तानी आयएसआय बनवतेय वेब सिरीज; प्रसाद पुरोहित यांचा कोर्टात धक्कादायक दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.