ETV Bharat / state

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करा, मंडळाच्या अध्यक्षांची सरकारकडे मागणी - मुंबई बातमी

राज्य मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मातंग समाजाच्या एकही प्रतिनिधीला स्थान मिळाले नाही. त्यामुळे समाजात एक नाराजीची भावना असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त करत सरकारने किमान महामंडळाचे कर्ज तरी माफ करावे, अशी मागणी गोरखे यांनी केली.

अमित गोरखे
अमित गोरखे
author img

By

Published : Jan 2, 2020, 8:59 AM IST

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला महाआघाडी सरकारने सुरुवात केल्यानंतर आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आपल्या महामंडळातील थकित कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी केली आहे. तसेच अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त मागील राज्य सरकारने 100 कोटीची तरतूद करून स्थापन केलेल्या समितीच्या कार्यकक्षा वाढवाव्यात, अशी मागणीही त्यांनी आज मुंबईत केली.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करा

राज्य मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मातंग समाजाच्या एकही प्रतिनिधीला स्थान मिळाले नाही. त्यामुळे समाजात एक नाराजीची भावना असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त करत सरकारने किमान महामंडळाचे कर्ज तरी माफ करावे, अशी मागणी केली. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे थकीत कर्ज सुमारे 68 कोटीच्या दरम्यान आहे. त्यामुळे हे कर्जमाफ झाल्यास समाजातील लाखो उपेक्षित घटकांना दिलासा मिळेल, असेही गोरखे म्हणाले.

हेही वाचा - देवनार, मालाड, महालक्ष्मी येथे पालिका प्राण्यांसाठी दहनभट्ट्या उभारणार

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मातंग समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदाचे वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष आहे. यासाठी मागील सरकारने केलेली आर्थिक तरतूद लक्षात घेऊन सरकारने त्यासाठीचा निधी तातडीने वितरित करावा आणि अण्णाभाऊ साठे महामंडळालाही कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा - 'मुंबईतील निर्जन स्थळे सुरक्षित करणार'

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या भागभांडवलात 1 लाख रुपयापर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. त्याच धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळांना सुद्धा हे 1 लाख रुपयाची थेट योजना तत्काळ लागू केल्यास त्याचा राज्यातील मातंग समाजाच्या लाखो उपेक्षित घटकांना लाभ होईल, यासाठी आपण सरकारकडे मागणी लावून धरत असल्याचे गोरखे यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Intro:अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करा, मंडळाच्या अध्यक्षांनी केली सरकारकडे मागणी

mh-mum-01-lokshahir-sathe-mandal-amitgorkhe-121-7201153

मुंबई, ता. 1 :

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला महाआघाडी सरकारने सुरुवात केल्यानंतर आता लोक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आपल्या महामंडळातील थकित कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच यंदा सुरू असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्म शताब्दी वर्ष यानिमित्ताने. मागील राज्य सरकारने 100 कोटीची तरतूद करून जे समिती गठित केली होती त्या समितीच्या कार्यकक्षा वाढवाव्यात अशी मागणीही त्यांनी आज मुंबईत केली.

राज्य मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मातंग समाजाच्या एकही प्रतिनिधीला स्थान मिळाले नाही त्यामुळे समाजात एक नाराजीची भावना असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त करत सरकारने किमान महामंडळाचे कर्ज तरी माफ करावे अशी मागणी केली. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे थकीत कर्ज सुमारे 68 कोटी च्या दरम्यान असून त्यामुळे हे कर्जमाफ झाल्यास समाजातील लाखो उपेक्षित घटकांना दिलासा मिळेल असेही गोरखे म्हणाले.
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मातंग समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदाचं वर्ष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्म शताब्दी वर्ष आहे, यासाठी मागील सरकारने केलेले आर्थिक तरतूद लक्षात घेऊन सरकारने त्यासाठीचा निधी तातडीने विपरीत करावा आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळालाही कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या भागभांडवलात एक लाख रुपये पर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित झाली आहे त्याच धर्तीवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळांना सुद्धा हे एक लाख रुपयाची थेट योजना तात्काळ लागू केल्यास त्याचा राज्यातील मातंग समाजाच्या लाखो उपेक्षित घटकांना लाभ होईल यासाठी आपण सरकारकडे मागणी लावून धरत असल्याचे हे गोरखे यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Body:अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करा, मंडळाच्या अध्यक्षांनी केली सरकारकडे मागणी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.