ETV Bharat / state

'अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत आहेत' - झिशान सिद्दीकी यांचा आरोप

author img

By

Published : May 8, 2021, 7:26 AM IST

परिवहन मंत्री अनिल परब हे माझ्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी केला आहे. वांद्रे पूर्व या माझ्या मतदार संघात शासकीय कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करूनही त्याची दखल कलेक्टर यांच्याकडून घेण्यात आली नसल्याचं झिशान सिद्दिकी कडून सांगण्यात आले आहे.

अनिल परब
अनिल परब

मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब हे माझ्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी केला आहे. वांद्रे पूर्व या माझ्या मतदार संघात शासकीय कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करूनही त्याची दखल कलेक्टर यांच्याकडून घेण्यात आली नसल्याचं झिशान सिद्दिकी कडून सांगण्यात आले आहे.

झीशान सिद्दीकी यांचा आरोप
मी माझ्या मतदार संघात मतदार करत असलेल्या कामांमध्ये परिवहन मंत्री अनिल परब अडथळा आणत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा सर्व आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. माझ्या मतदारसंघात काल सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला मला बोलवण्यात आलेलं नाही. मंत्री अनिल परब, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच शिवसेनेचे काही कार्यकर्ते यांनी आपापसातच हा कार्यक्रम आटोपला. प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार म्हणून मला बोलावण्यात आले पाहिजे होते. मात्र तसं न करता, या कार्यक्रमात मला डावलण्यात आलं. असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला आहे. वांद्रे पूर्व या मतदार संघातून माझा विजय झालेला आहे. लोकांनी मला निवडून दिल आहे हे अनिल परब यांनी मान्य करावे, असा टोलाही अनिल परब यांना झिशान सिद्दिकी यांनी लगावला.या आधीही आमदार म्हणून, मी माझ्या मतदार संघात जी कामे करण्याचा प्रयत्न करतोय त्या, कामांमध्ये देखील अनिल परब अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडून करण्यात येणाऱ्या कामांना मुंबई महानगरपालिकेकडून एनओसी दिली जात नाहीये. तसेच वांद्रे पूर्व या माझ्या मतदारसंघात अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत मी कलेक्टर यांच्याकडे तक्रार देखील केली. मात्र अद्याप त्यावर ही कोणती कारवाई झाली नाही अशा प्रकारचे गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी केले आहेत. तसेच या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या माहिती दिली असल्याच झिशान सिद्दीकी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.