ETV Bharat / state

वाझेची वसुली रक्कम मुंबई ते नागपूर व्हाया दिल्ली?; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना कोठडी

अनिल देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही ईडीने अटक केली. न्यायालयाने दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ईडीच्या वकिलांनी न्यायालयात अनिल देशमुख, सचिन वाझे, पालांडे आणि शिंदे यांच्याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

nagpur
nagpur
author img

By

Published : Jun 26, 2021, 9:09 PM IST

Updated : Jun 26, 2021, 10:41 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. शुक्रवारी (25 जून) अनिल देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतल्या निवासस्थानी व कार्यालयात ईडीकडून धाडसत्र सुरू होतं. त्यांच्या वरळीतल्या निवासस्थानी तब्बल 11 तास धाडसत्र सुरू होतं. यावेळी स्वतः देशमुखही हजर होते. दरम्यान, काल रात्री उशिरा अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही ईडीने अटक केली. या दोघांना न्यायालयात सादर करण्यात आलं. दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता देशमुखांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेखर जगताप, आरोपींचे वकील

तर, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीइकडून 29 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची समन्स बजावण्यात आली आहे. आज (26 जून) ते ईडीपुढे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले होते. तसेच हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.

'दोघांनी बार मालकांकडून उकळले पैसे'

ईडीनं शनिवारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना न्यायालयात सादर केलं. हे दोघेही अनिल देशमुखांचे खासजी सचिव आणि खासगी स्वीय सहाय्यक आहेत. 'या दोघांनी बार मालकांकडून पैसे उकळले आहेत. ज्या बार मालकांकडून पैसे घेण्यात आले होते, त्या बार मालकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. हे उकळलेले पैसे या दोघांनी सचिन वाझेला दिले. याबाबतचा सचिन वाझेचा तळोजा कारागृहात जबाबही नोंदवण्यात आला आहे', असे ईडीच्या वकिलाने न्यायालयात म्हटले.

'सचिन वाझेने मुंबईतून जवळपास सव्वातीन कोटी वसूल केले'

सचिन वाझेनं मुंबईतील झोन 1 ते 7 मधून जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 1 कोटी 64 लाख रुपयांची वसूली बारमधून केली. तर झोन 8 ते 12 मधून 2 कोटी 66 लाख रुपयांची वसुली केली. ही वसुली बार मालकांना एक्ट्रा परवानगी मिळण्यासाठी केली जात होती. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या नावे नागपुरात साई संस्था ट्रस्ट नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या बॉडीवर कुंदन शिंदे आहे. तसंच दिल्लीसह अनेक ठिकाणच्या कंपन्यामध्ये कुंदन मोठ्या पदावर आहे. कुंदन शिंदे हा अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पैसे जमा करायचा. तर पालांडे पोलीस बदल्यांचे पैसे जमा करायचा. यातील पैशांचा व्यवहार कुठे झाला? कसा झाला? पैसे कुठे गुंतवण्यात आले? यांचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. या सगळ्यात आजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे', असे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले.

'पालांडेवरील आरोप बिनबुडाचे'

'ईडीकडून हे सर्व ठरवून केलं जात आहे. तासनतास चौकशीनंतर ईडीकडून अटक केली जाते. मध्यरात्री अटक करुन घरच्यांना याची कल्पना द्यायला सांगितली जाते. वाझेनं जेथून पैसे उकळले. त्याचं ठिकाण नमुद करण्यात आलं नाही. त्याची वेळ नमुद करण्यात आली नाही. पालांडे पोलिसांच्या बदल्यांसाठी जे पैसे घेतात तो आरोप बिनबुडाचा आहे. पोलीस दलातील बदल्या या गृहसचिव आणि पोलीस महासंचालक यांची कमिटी करत असते. हे आरोप फक्त राजकीय आणि बदनामीच्या हेतूने केले जात आहेत. पालांडे यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. सचिन वाझेने बार मालकांकडून पैसे घेतले, बार मालकांनी वाझेंना पैसे दिले. हा गुन्हा नाही का? तरीही त्यांच्याकडे साक्षीदार म्हणून पाहिलं जातं', असा युक्तिवाद पालांडेंच्या वकिलाने न्यायालयात केला.

'वाझेकडून मिळालेले पैसे दिल्लीला जाऊन नागपुरात आले'

'वाझेनं जे पैसे जमा केले, ते 4 कोटी 70 लाख रुपये होते. ही वसूल केलेली रक्कम वाझेने कुंदन शिंदे यांना दिली. कुंदन शिंदे यांनी हे पैसे हावालामार्फत दिल्लीला पाठवले. पाठवलेले पैसे पुन्हा श्री साई संस्था नागपूर येथे जमा झाले', असे ईडीच्या वकिलांनी म्हटले. दरम्यान, ईडीकडून न्यायालयात आरोपींच्या बँक खात्यासंदर्भात माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.

दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीइकडून 29 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आलेले आहेत. आज (26 जून) ते ईडीपुढे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले होते. तसेच हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.

हेही वाचा - Pune New Restrictions : डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पुन्हा निर्बंध; दुकाने चारपर्यंतच सुरू

Last Updated : Jun 26, 2021, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.