ETV Bharat / state

येस बँक प्रकरण: अनिल अंबानी सक्तवसुली संचलनालयात हजर - राणा कपूर

येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचलनालया (ईडी) मार्फत चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता अनिल अंबानी यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. अनिल अंबानी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.

Anil Ambani
अनिल अंबानी ईडी समोर हजर
author img

By

Published : Mar 19, 2020, 11:11 AM IST

Updated : Mar 19, 2020, 12:29 PM IST

मुंबई - रिलायन्स कंपनीचे अनिल अंबानी सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. येस बँकेकडून 12 हजार 800 कोटी रुपये कर्ज घेतल्याप्रकरणी अंबानी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

अनिल अंबानी सक्तवसुली संचलनालयासमोर हजर

येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता अनिल अंबानी यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी अनिल अंबानी यांना सोमवारीच ईडी कार्यालयात हजर राहणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनिल अंबानी यांनी पुढील तारखेची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना आज (गुरुवारी) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

हेही वाचा - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर; पुणे, मुंबईसह रत्नागिरीतही आढळला रुग्ण

अनिल अंबानी यांनी येस बँकेकडून 12 हजार 800 कोटींच कर्ज घेतले आहे. जे अद्याप भरण्यात आलेले नाही. येस बँकेकडून अनिल अंबानी समूह, एस्सेल समूह, व्होडाफोन, आयएलएफएस, डिएचएफएल या सारख्या कंपन्यांनी मोठे कर्ज घेतले आहे. ज्याची परतफेड होण्यास विलंब होत आहे. ईडीकडून या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Last Updated : Mar 19, 2020, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.