मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना अँजिओग्राफी उपचाराकरिता मुंबईतील खाजगी ( Angiography test by Anil Deshmukh ) जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 ऑक्टोंबर रोजी अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अनिल देशमुख यांच्यावर अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली असून, दोन दिवसात रिपोर्ट येणार ( Anil Deshmukh Angiography test report ) आहे. त्यानंतर पुढील उपचार होणार आहे.
गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख कोठडीत - यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी कडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांना वयाच्यानुसार अनेक गंभीर आजार असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी करिता परवानगी देण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला होता. या अर्जाला मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाने परवानगी दिली होती.
देशमुख यांची दिवाळी कारागृहात की घरी ? अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या आरोपानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. तरीदेखील अनिल देशमुख यांना तुरुंगातच राहावे लागत आहे. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अद्यापही जामीन न मिळाल्याने त्यांना जामीन मिळवून देखील सुद्धा न्यायालयीन कोठडीत राहावं लागत आहे. सीबीआय प्रकरणाचा अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या विशेष कोर्ट निर्णय देणार आहे त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहात की घरी हे उद्या स्पष्ट होणार आहे.