ETV Bharat / state

Anganwadi Worker Protest Mumbai: तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही; अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावर एल्गार - Protest on Azad Maidan Mumbai

अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यासांठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

Anganwadi Worker Protest Mumbai
अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावर एल्गार
author img

By

Published : Feb 28, 2023, 9:04 PM IST

मुंबई: अंगणवाडी सेविकांना वाढीव पगार द्यावा, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी द्यावी आदी विविध मागण्या अद्याप सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या नाहीत. याच्या निषेधार्थ आजपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनात उतरल्या आहेत. सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आझडा मैदानातील आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. मागण्या सरकारने त्वरित मार्गी लावाव्या, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन: दिल्ली, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यातील अंगणवाडी सेविकांना जास्त मानधन मिळते. मात्र, राज्यात दोन लाख अंगणवाडी सेविका असून त्यांना तुटपुंजा म्हणजेच ८५०० रुपये तर मदतनिसांना ४४५० रुपये इतका पगार दिला जातो. राज्यात मिनी अंगणवाड्या आहेत. त्यामधील सेविका आणि मदतनीस यांनाही तुटपुंजा पगार दिला जातो. या सेविकांना सेवाशर्तीचे सर्व फायदे दिले जावेत. देशभरात महागाई वाढली आहे असे असताना गेल्या ५ वर्षात पगारात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पगारात वाढ करावी. अंगणवाडी केंद्राची नोव्हेंबर २०२१ पासून भाडयाची रक्कम द्यावी, मोबाईल रिचार्जेचे पैसे ऑक्टोबर २०२१ पासून देण्यात आलेले नाहीत. आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज आझाद मैदानात आंदोलन करण्यात आल्याची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली.

सरकार विरोधात घोषणाबाजी: हजारो अंगणवाडी सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या सेविकांच्या शिष्टमंडळाला दुपारी मंत्रालयात भेटीचे निमंत्रण देण्यात आले. दुपारी शिष्टमंडळ मंत्रालयात पोहचले मात्र त्यानंतरही मंत्र्यांची भेट न झाल्याने आझाद मैदानात तीव्र नाराजी पसरली होती. याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणा करून आझाद मैदान दणाणून सोडले. जो पर्यंत सरकारकडून पगार वाढ, पेंशन, ग्रॅच्युइटी आदी प्रश्न तोडगा निघणार नाही, तोपर्यंत आजाद मैदानात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने यावेळी दिला.

सरकारचा निर्णय घेत नाही: प्रकल्प, जिल्हा, राज्य स्तरावर सातत्याने आंदोलने केली जात आहे. या संदर्भात अंगणवाडी सेविका जयश्री पाटील तसेच या अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे नेते शुभा शमीम, एमए पाटील यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद बोलताना सांगितले की, अंगणवाड्यांना दिले गेलेले मोबाईल नादुरुस्त आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ करु, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने देखील शासनाचे नोकर म्हणून मान्यता द्या, असा निर्वाळा दिला होता. तरीही महाराष्ट्र शासन याबाबत ठोस निर्णय घेत नाही, त्यामुळे आम्ही विविध मागण्यांच्यासाठी आता आम्ही टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या -

  1. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा
  2. महागाई भत्त्यासह वेतनश्रेणीशह मानधनात वाढ व्हावी
  3. पोषण ट्रॅकर मराठीत करणे तसेच नवीन मोबाईलची मागणी
  4. ग्रॅच्युईटी लागू करावी
  5. आहार व इंधनाचे दर
  6. अंगणवाडीचे भाडे वाढवावे
  7. पटसंख्या अभावी अंगणवाड्या बंद करण्याचा शासनाचा विचार मागे घ्यावा
  8. दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस द्यावा
  9. थकित प्रवास आणि बैठक भत्ता आहार अनुदान व इंधनभत्ता द्यावा

हेही वाचा: Anganwadi Worker Suicide : धक्कादायक! अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.