ETV Bharat / state

Department of Health : चिंताजनक! मुंबईतील महिलांमध्ये रक्तक्षय, उच्च रक्तदाब, डायबेटिकचे आजार

author img

By

Published : Nov 13, 2022, 5:19 PM IST

मुंबईमध्ये 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' (Mata surkshit tar ghar surkshit) अभियानानुसार 18 वर्षावरील 2 लाख 90 हजार महिलांची तपासणी करण्यात आली. या तापसणीत 11 हजार 465 महिलांना रक्तक्षय, 986 महिलांना तीव्र रक्तक्षय 8158 महिलांना उच्च रक्तदाब तर 5328 महिलांना डायबेटिक असल्याचे समोर आले आहे. रक्तक्षय, रक्तदाब आणि मधुमेह आजार झालेल्या महिलांना पुढील उपचारासाठी दवाखाने तसेच रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Department of Health
मुंबईतील महिलांमध्ये रक्तक्षय, उच्च रक्तदाब, डायबेटिकचे आजार

मुंबई: 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान राज्यभरात राबवले जात आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने 26 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत 18 वर्षावरील 2 लाख 90 हजार 83 लाभार्थी महिलांची तपासणी केली. त्यातील 2 लाख 82 हजार 919 लाभार्थ्यांची ब्लडप्रेशरची तपासणी केली असता, त्यात 8158 लाभार्थ्यांना रक्तदाब झाल्याचे निदान झाले आहे. 2 लाख 71 हजार 991 लाभार्थ्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात 11 हजार 465 लाभार्थ्यांना रक्तक्षय म्हणजेच रक्ताचा टीबी तर 986 लाभार्थ्यांना तीव्र रक्तक्षय झाल्याचे निदान झाले आहे. 2 लाख 71 हजार 583 लाभार्थ्यांच्या रक्तातील साखरेचे म्हणजेच मधुमेह चाचणी करण्यात आली. त्यात 5328 लाभार्थ्यांना मधुमेह झाल्याचे निदान झाले आहे. दंत रोग तपासणीसाठी 916 शिबिरे घेण्यात आली. त्यात 6784 लाभार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली आहे. 30 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 1 लाख 3 हजार 420 महिलांची डायबेटिकची चाचणी करण्यात आली. त्यात 7475 महिलांना डायबेटिक म्हणजेच मधुमेह असल्याचे निदान झाले आहे. रक्तक्षय ब्लड प्रेशर, मधूमेह असलेल्या महिलांना जवळच्या दवाखाने, रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेजमध्ये उपचारसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

30 वर्षावरील महिलांमध्ये हे आजार अधिक: महापालिकेने अमेरिकारेच्या सहकार्याने मधुमेह आणि हायपरटेंशन स्क्रीनिंगचा एनएसडी दिशा प्रकल्प राबवला असून एफ नॉर्थ, एच ईस्ट, के ईस्ट, पी नॉर्थ, एम ईस्ट आणि एल या 6 महापालिका प्रभागांमध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे घरोघरी सर्वेक्षण केले आहे. एका वर्षात 1 लाख 83 हजार 682 लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात हायपरटेंशनचे 6632 आणि डायबेटीकचे 4540 रुग्ण आहेत. भारतीय आहारतज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्य विभाग सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये मधुमेह आणि हायपरटेंशन रूग्णांना आहार समुपदेशन सेवा देत आहे आणि गेल्या एका वर्षात एकूण 24 हजार 230 रूग्णांना आहार आणि जीवनशैली बदल सल्ला देण्यात आला आहे.

या केल्या उपाययोजना: भारतीय आहारतज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्य विभाग सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये मधुमेह आणि हायपरटेंशन रूग्णांना आहार समुपदेशन सेवा देत आहे. गेल्या एका वर्षात एकूण 24 हजार 230 रूग्णांना आहार आणि जीवनशैली बदल सल्ला देण्यात आला आहे. वारंवार लघवी होणे, थकवा, जास्त तहान लागणे, अंधुक दिसणे, हात-पाय सुन्न होणे किंवा पायावर सूज, व्रण येणे यासारख्या लक्षणांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. ही लक्षणे दिसल्यास व्यक्तींनी महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालयांमध्ये सल्ला व तपासणी करून घ्यावी. पालिका लवकरच होर्डिंग्ज, बॅनर प्रदर्शित करणार आहे, रेडिओ जिंगल्स वाजवणार आहे आणि डायबिटीज आणि हायपरटेंशनबद्दल जागरूकता आणण्यासाठी लघुपट प्रदर्शित करणार आहे.

आरोग्य विभागाचे आवाहन: मुंबईतील नागरिकांनी 200 हून अधिक महानगरपालिका दवाखाने आणि बाळासाहेब ठाकरे क्लिनिक, पॉलीक्लिनिकमध्ये मधुमेह आणि हायपरटेंशनची तपासणी, पुष्टी आणि उपचारांसाठी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी केले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांच्या जीवनशैलीत बदल करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. पालिकेने 24 वॉर्डांमध्ये 149 योग केंद्रे देखील सुरू केली आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी केले आहे. मधुमेह असलेल्या 50 टक्के लोकांना त्यांच्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल माहिती नसते आणि ज्यांना मधुमेह आहे ते नियमित उपचार घेत नाहीत आणि त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहणे आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. (Appeal of the Department of Health)

16 हजार 942 विद्यार्थ्यांना समुपदेशन: मुंबई पालिकेच्या शाळा आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांमधील विद्यार्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तपासणी आणि समुपदेशन केले जाते. आरबीएसके पथकाने 245 शाळांची तपासणी केली. त्यात 14 हजार 416 विद्यार्थ्यांची तपासणी केली. या पथकाने 358 समुपदेशन कॅम्प आयोजित केले त्यात 16 हजार 942 विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.(Counseling to 16 thousand 942 students)
- 2 लाख 90 हजार महिलांची तपासणी (Examination of 2 lakh 90 thousand women)
- 11,465 महिलांना रक्तक्षय
- 986 महिलांना तीव्र रक्तक्षय
- 8158 महिलांना उच्च रक्तदाब
- 5328 महिलांना मधुमेह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.