ETV Bharat / state

Andheri Gokhale Bridge: गोखले पूल सोमवारपासून बंद, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पूल (Gokhale Bridge) धोकादायक झाल्याने सोमवार ७ नोव्हेंबरपासून रहदारीसाठी बंद केला जाणार आहे. (Andheri Gokhale bridge closed).

Andheri Gokhale Bridge
Andheri Gokhale Bridge
author img

By

Published : Nov 4, 2022, 9:23 PM IST

मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पूल (Gokhale Bridge) धोकादायक झाल्याने सोमवार ७ नोव्हेंबरपासून रहदारीसाठी बंद केला जाणार आहे. (Andheri Gokhale bridge closed). पालिकेकडून १६० कोटी रुपये खर्च करून चार मार्गिकांचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यानुसार पालिका हद्दीमधील बांधकाम सुरू झाले असून, रेल्वे हद्दीमधील पूल पाडल्यानंतर संबंधित काम केले जाणार आहे. सोमवारपासून पुलावरील रहदारी बंद केल्यावर नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोखले पूल झाला धोकादायक: अंधेरी येथील गोखले पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका वर्षात १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. नऊ जणांच्या मृत्यूनंतर पालिकेने मुंबईमधील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. गोखले पुलाचे ‘एससीजी कन्सलटन्सी सर्व्हिस कंपनी’कडून ऑक्टोबरमध्ये ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाला भेगा पडल्याने तो धोकादायक बनला असल्याने पाडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पूल ७ नोव्हेंबर पासून रहदारीसाठी बंद: सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार, सध्याचा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. पुलाखालून पश्चिम रेल्वे धावत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेच्या भागाकडचा पूल त्वरित बंद करावा, अशी मागणी अंधेरी पश्चिम येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. हा पूल सोमवार ७ नोव्हेंबर पासून रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. पालिकेने पुलाचा रेल्वे हद्दीमधील भाग वगळता रस्त्यावरील काम एप्रिल २०२२ पासून सुरू केले आहे. यासाठी सुमारे ८० कोटी, तर रेल्वे हद्दीमधील पुलाच्या बांधकामासाठी ८० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. रेल्वे हद्दीमधील पुलाच्या बांधकामासाठी पुढील १५ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्गाचा वापर करा: अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पूल बंद केल्याने या विभागात जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांनी ७ नोव्हेंबरपासून खार सबवे, मिलन सबवे उड्डाण पूल, विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे उड्डाण पूल, अंधेरी सबवे, जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल, गोरेगाव येथील मृणाल गोरे उड्डाण पूल यांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.