ETV Bharat / state

अंनिसने राबवला फटाक्याऐवजी फराळ उपक्रम - firecrackers

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पश्चिम उपनगरातील शाखेतर्फे यावर्षी फटाक्यांऐवजी फराळ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

फराळ देताना
author img

By

Published : Oct 30, 2019, 10:34 PM IST

मुंबई - दिवाळी जरी संपली असली तरी दिवाळीचा उत्साह मात्र आठवडाभर कायम असतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पश्चिम उपनगरातील शाखेतर्फे यावर्षी फटाक्यांऐवजी फराळ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

माहिती देताना तृप्ती गायकवाड

वातावरण प्रदूषित करणारे, प्राणी, पक्षी, मुले, वृद्धांना जीवघेणे ठरणारे व पर्यावरणाचा ऱ्हास करणारे फटाके न वाजवता त्याऐवजी तेवढ्या पैशाचा दिवाळीचा फराळ गरिबांसाठी दान करावे, असे अंनिसने नागरिकांना आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी स्वईच्छेने फोन करून आपले फराळ देत या उपक्रमात सहभाग नोंदवला.

मुंबई सेंट्रल ते भाईंदर पर्यंतच्या परिसरातून जमा झालेला हा दिवाळीचा फराळ मीरा रोड व दहिसर येथील रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना वाटण्यात आला.

यावर्षी आपल्यासोबतच इतरांची सुद्धा दिवाळी गोड करूयात, या अंनिसच्या आवाहनाला मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. गोड खाऊ मिळाल्यानंतर त्या लोकांना झालेला आनंद पाहून कार्यकर्त्यांनाही समाधान वाटले, असे अंनिसच्या तृप्ती गायकवाड यांनी सांगितले.

Intro:मुंबई

दिवाळी जरी संपली असली तरी दिवाळीचा उत्साह मात्र आठवडाभर कायम असतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पश्चिम उपनगरातील शाखेतर्फ यावर्षी फटाक्याऐवजी फराळ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
वातावरण प्रदूषित करणारे, प्राणी-पक्षी-मुले-वृद्ध यांना जीवघेणे ठरणारे व पर्यावरणाचा ऱ्हास करणारे फटाके न वाजवता त्याऐवजी तेवढ्या पैशाचा दिवाळीचा फराळ गरिबांसाठी दान करावे हा या उपक्रमाचा उद्देश होता. ही कल्पना मुंबईतील अनेक नागरिकांना खूप आवडली व लोकांनी स्वेच्छेने स्वतः फोन करून आपले फराळ देत या उपक्रमात सहभाग नोंदवला.Body:मुंबई सेंट्रल पासून ते भाईंदर पर्यंतच्या परिसरातून जमा झालेला हा दिवाळीचा फराळ मीरा रोड व दहिसर येथील रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना वाटण्यात आला.
यावर्षी 'आपल्यासोबतच इतरांची सुद्धा दिवाळी गोड करूयात' अंनिसच्या शाखेतर्फे केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि गोड खाऊ मिळाल्यानंतर त्या लोकांना झालेला आनंद पाहून कार्यकर्त्यांनाही समाधान वाटले. असे अंनिसच्या तृप्ती गायकवाड यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.