ETV Bharat / state

न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी - अंबानी स्फोटक प्रकरण

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेची "बायपास शस्त्रक्रियेमधून बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैद ठेवण्यासाठीची मागणी करणारा विनंती अर्ज फेटाळला एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे. सचिन वाझे यांना तुरुंगातील रुग्णालयाच्या कक्षात ठेवण्यात येईल, घरगुती जेवणाची परवानगी असेल आणि गरज असेल तेव्हा जेजे रुग्णालयात नेले जावे, अशा सूचनाही न्यायालायने केल्या आहेत.

म
c
author img

By

Published : Sep 29, 2021, 6:31 PM IST

Updated : Sep 29, 2021, 6:47 PM IST

मुंबई - निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेची "बायपास शस्त्रक्रियेमधून बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैद ठेवण्यासाठीची मागणी करणारा विनंती अर्ज फेटाळला एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे. सचिन वाझे यांना तुरुंगातील रुग्णालयाच्या कक्षात ठेवण्यात येईल, घरगुती जेवणाची परवानगी असेल आणि गरज असेल तेव्हा जेजे रुग्णालयात नेले जावे, अशा सूचनाही न्यायालायने केल्या आहेत.

तळोजा कारागृह रुग्णालयात

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेची नुकताच बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे बायपास शस्त्रक्रियेमधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यासाठीचा विनंती अर्ज विशेष न्यायालयात करण्यात आला होता. या याचिकेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला असून, तळोजा कारागृहाशी संलग्न रुग्णालये आधुनिक आणि अशा परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. सीआरपीसीच्या कलम 309 अंतर्गत सचिन वाझेची न्यायालयीन कोठडी सीआरपीसीच्या कलम 767 मध्ये बदलली जाऊ शकत नाही. एका गंभीर प्रकरणात आरोपीला नजरकैदेत ठेवणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांच्या विरोधात आहे. वाझेंची नजरकैदेची याचिका मंजूर झाल्यास ते फरार होऊ शकतात, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे. यावर बुधवारी (दि. 29 सप्टेंबर) विशेष न्यायालयाने सचिन वाझे यांचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. आता सचिन वाझे याला तळोजा कारागृह रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

काय होती सचिन वाझेची मागणी..?

न्यायालयाने वाझे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्याचा 48 तासांच्या अगोदर सूचना देण्याचे निर्देश दिले होते. वाझे यांनी आपले वकिल सजल यादव आणि आरती कालेकरच्या माध्यमातून 12 सप्टेंबरला बायपास शस्त्रक्रियानंतर न्यायालयात याचिका दाखल केली होती. दाखल केलेल्या याचिकेत वाझे यांनी म्हटले, 28 सप्टेंबर, 2012 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बायपास शस्त्रक्रियातून लवकर बरे होण्यासाठी घरी तात्पुरत्या नजरकैदेत ठेवण्यात यावे. तसेच आपल्या याचिकेत वाझे म्हणाले की, माझी संवेदनशील शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे मला कारागृहात परत पाठवण्यात येऊ नयेत, तिथे मला पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मिळणार नाही आणि अधिक संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित, स्वच्छ आणि तणावमुक्त वातावरणात राहून लवकर बरे होण्यासाठी वाझेने विशेष न्यायालयाकडे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरती नजरकैद देण्याची परवानगी मागितली होती.

हेही वाचा - राजकीय कलगीतुरा.. महाआघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा, तर भाजपा नेत्यांच्या मागे राज्य तपास यंत्रणांचा ससेमिरा

Last Updated : Sep 29, 2021, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.