ETV Bharat / state

Teacher Money Stolen : एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्याच्या नावाखाली वृद्ध शिक्षिकेला घातला गंडा; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई उपनगरातील मालाड पोलिसांनी नालासोपारा परिसरातील एका लॉजमधून दोन भामट्यांना अटक केली आहे. दोन आरोपींनी एका ज्येष्ठ नागरिक महिला शिक्षिकेची एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करण्याचे आमिष दाखवून खात्यातून लाखो रुपये उकळले आहेत.

Teacher Money Stolen
Teacher Money Stolen
author img

By

Published : Jan 29, 2023, 6:37 PM IST

Updated : Jan 30, 2023, 7:17 AM IST

एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्याच्या नावाखाली वृद्ध शिक्षिकेला घातला गंडा

मुंबई : दोन्ही आरोपी एटीएम सेंटरमध्ये बँकेचे ग्राहक म्हणून उभे होते. आपल्या जाळ्यात कोणी फसते का हे पाहत होते. संधी साधून ज्येष्ठ नागरिक महिलेला मदतीच्या नावाखाली दोन भामट्यांनी दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये नेले. त्यांनी हातचलाखी करुन महिलेला दुसरेच एटीएम कार्ड देऊन पळ काढला. मालाडशिवाय इतर अनेक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध असे ५ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

फसवणुकीचा गुन्हा दाखल : सेवानिवृत्त महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले की, महिलेने स्टेट बँक ऑफ इंडिया मालाड शाखेतून नवे एटीएम कार्ड मागितले होते. महिलेला एटीएम कार्ड मिळाल्यानंतर ती बँकेत घेऊन गेली. बँक कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्यास सांगितले. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करत असताना ते ऍक्टिव्हेट होत नव्हते. याचदरम्यान त्यांच्या मागे उभा असलेल्या ठगाने दुसऱ्या एटीएममध्ये त्यांना नेले. दुसरा ठग टॅक्सी घेऊन बाहेर उभा होताच. याच टॅक्सीतून दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये नेऊन एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट केले. नंतर हातचलाखी करुन भामट्यांनी महिलेला गंडा घालून तिचे एटीएम स्वतःजवळ ठेऊन तिला दुसरेच कार्ड दिले. या सर्व प्रकार एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये घडला. नंतर महिला घरी गेल्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला.

15 हजारांची रोकड जप्त : बँकेच्या आत तसेच एटीएम केंद्राबाहेर सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे. तपासात आरोपींनी वापरलेली काळी पिवळी टॅक्सी सापडली असून टॅक्सी चालकाने दोन्ही आरोपींना कुठे सोडले ते सांगितले. पोलिसांनी त्या भागात दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला असता दोन्ही गुंड एका लॉजमध्ये राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या दोघांकडून विविध 5 बँकांचे डमी एटीएम कार्ड, 2 मोबाईल फोन, 15 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सुशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर 5 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अदाणे, मालाड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांच्या पथकात कॉन्स्टेबल, फर्नांडीज, चुंगीडियार, महाडिक, गायकवाड, पाईकराव वाघ आदी सहभागी झाले.

हेही वाचा - BBC Documentary On Modi : एफटीआयआयमध्ये बीबीसीच्या मोदींवरील 'त्या' डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग

Last Updated : Jan 30, 2023, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.