ETV Bharat / state

Accident on JJ flyover : जे जे उड्डाणपुलावर ॲम्बुलन्सची पोलिसा व्हॅनला जोरदार धडक

author img

By

Published : Mar 16, 2023, 12:27 PM IST

जे.जे.उड्डाणपुलावर बुधवारी तीन वाहने एकमेकांवर धडकली. या अपघातात दोन जण जखमी झाले. अपघात झालेल्या वाहनांमध्ये एक रुग्णवाहिका, साकीनाका विभागातील एसीपीची बोलेरो आणि टॅक्सी यांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाला जे.जे.मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अनिल कुलकर्णी 48 वर्षे असून तो पुण्याचा रहिवासी आहे.

EtvAccident on JJ flyover : Bharat
जेजे उड्डाण पुलावर अपघात

मुंबई: जे जे मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसटीहून भायखळ्याच्या दिशेने वेगाने जाणारी रुग्णवाहिका जेजे फ्लायओव्हरवर अचानक दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या पोलिस बोलेरो वाहनाला आणि टॅक्सीला धडकली. ही दोन्ही वाहने भायखळ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जात होती. यामध्ये बोलेरो आणि टॅक्सी चालक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या पोलीसांच्या वाहनाला रुग्णवाहिकेच्या चालकाने धडक दिली ते वाहन साकीनाका विभागातील एसीपीचे होते. साकीनाक्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त हे विधानसभेच्या सुरक्षेत व्यस्त होते असून त्यासाठी ते आझाद मैदानावर होते.

एसीपीच्या वाहनाला दुरुस्तीचे काम करावे लागणार होते, त्यासाठी त्यांच्या चालकाने वाहन नागपाडा येथील पोलिस गॅरेजमध्ये नेले होते आणि ते वाहन दुरुस्त करून आझाद मैदानाकडे परत येत होते. या अपघातात एसीपीचा चालक जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात टॅक्सी चालकही जखमी झाला असून त्याच्यावर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जे जे मार्ग पोलिसांनी रुग्णवाहिका चालक अनिल मयूर कुलकर्णी याला अटक केली आहे.

कुलकर्णी हे पुण्याचे रहिवासी असून तो चालवत असलेली रुग्णवाहिका रिकामी होती. या अपघातात कुलकर्णी यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी कुलकर्णीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. नंतर वैयक्तिक जामीनावर त्याची मुक्तता करण्यात आली. वाहन चालक असलेले पोलीस शिपाई प्रकाश कोतवाल, (36) यांनी जीजी मा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

पोलीस शिपाई कोतवाल हे बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सरकारी वाहन मोटर क्रमांक MH 01 ए एन 592 महिंद्रा स्कार्पिओ घेऊन आझाद मैदानला जात असताना जे जे फ्लावर साऊथ बाँड जात असताना साधारण अर्धा किलोमीटर अंतर गेल्यावर जे ओबी 125 समोर नॉर्थ बाँड वरून भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाचे ॲम्बुलन्स क्रमांक MH 43 BX 94 26 याचा चालक अनिल मयूर कुलकर्णी याने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवून पोलीस शिपाई कोतवाल यांच्या वाहनास धडक दिली व त्यांचे पाठीमागील टॅक्सी क्रमांक MH 01 CR 7144 यास देखील जोराची धडक दिली.या अपघातात पोलीस शिपाई कोतवाल यांच्या उजव्या हातास फ्रॅक्चर झाले, मानेस व छतीस दुखापत झाली अशी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा : Nashik Accident News: बिबट्याच्या हल्ल्याच्या तपासणी करायला जाणाऱ्या वनविभागाच्या वाहनाचा भीषण अपघात; तीन गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.