मुंबई: पुणे महानगर पालिकेत ५ फेब्रुवारीला भाजप नेते किरीट सोमय्या तक्रार करण्यास गेले असता त्याच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. मला मारण्याचा प्लान तयार होता असा आरोप त्यांनी केला व त्या संबंधी काही व्हिडिओ क्लिप राज्यपालांना दाखल्या या संदर्भात दिल्लीला जाऊन तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
राज्यपालांनी व्यक्त केली चिंता
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतल्यानंतर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की झालेल्या घटनेबाबत त्यांनी फार चिंता व्यक्त केली. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचे आहे. या पूर्ण प्रकरणाबाबत ते स्वतः गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी ही करायला सांगणार आहेत.
गुरुवारी दिल्लीत गृह सचिवांना भेटणार
या संदर्भात ते गुरुवारी दिल्लीला जाऊन गृह सचिवांची भेट घेणार आहेत. सोमय्या यांच्यावर मारहाण प्रकरणी फक्त ८ लोकांवर कारवाही करण्यात आली आहे. परंतु ते ऐकून ६४ लोक आहेत ज्यांनी माझ्यावर हल्ला केला असे सांगत जो पर्यंत या ६४ लोकांवर कारवाही होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.
धमक्यांना घाबरणार नाही
शुक्रवारी ते पुण्याला जाणार असून जर दोषींवर कारवाही झाली नाही तर तिथे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे सरकारचे ऐकतात. दगड फेकणाऱ्यांना पोलिसांनी मदत केली असा आरोप सुद्धा सोमय्या यांनी केला आहे. मोदी सरकारच्या कमांडो मुळे मी त्या दिवशी वाचलो. उद्धव ठाकरेंनी कितीही उद्धटपणा केला, संजय राऊत यांनी कितीही धमक्या दिल्या तरीही मी यांचा ब्रष्टाचार काढणार असेही किरीट सोमय्या म्हणाले.