मुंबई - जपानच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान सरकारने मानद डॉक्टरेट प्रदान केली. ही राज्यासाठी गौरवाची बाब असून, अर्थातच या कारणाने त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस अत्यंत आनंदात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना जपान सरकारकडून डॉक्टरेट देण्यात आलीये. माझ्या लग्नापासूनच मला माहिती होते की देवेंद्र फडणवीस हे पॉलिटिकल डॉक्टर आहेत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने आयोजित 'कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान' या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. (Amruta Fadnvavis on Devendra Fadnavis) (Japan Koyasan University Devendra Fadnavis Doctorate)
कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर आहेत. त्यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा जपानमधील "कोयासन विद्यापीठाने" केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांना आता डॉक्टर ही पदवी दिली जात आहे. पण मला लग्न झाल्यापासून माहिती आहे की ते डॉक्टरच आहेत व ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत - अमृता फडणवीस, पत्नी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न - या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकदा पुन्हा या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना जपान येथे मानद डॉक्टरेट प्रदान करण्याची घोषणा झाली, त्यांचं एक स्वप्न आहे की, महाराष्ट्र कॅन्सरमुक्त झाला पाहिजे. त्यांच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले होते. तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं की हा महाराष्ट्र कॅन्सरमुक्त झाला पाहिजे. नागपूरमध्येसुद्धा मोठं एनसीआर कॅन्सर हॉस्पिटल उभं राहिलं आहे. ते मुख्यमंत्री असताना ५ वर्षाच्या कार्यकाळात कॅन्सरमुक्त करण्यासाठी अनेक कॅम्प त्यांनी लावले. शासनाने भरपूर मदत केली. शासन काम करत असताना संघटनेची ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी जनजागृती होणे फार गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात यासाठी कॅम्प लावत आहे.
हेही वाचा -