मुंबई - सुशांत-कंगना प्रकरणाच्या गोंधळात आता भाजपामधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रत्युत्तर दिल्यानंतर आता या वादात अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे.
“अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?” असे म्हणत खडसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी “तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !,” असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
-
तुम्ही खात्री बाळगा @EknathKhadseBJP ji , तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नहीं ! सर्वांचे भले होवो ! @BJP4Maharashtra https://t.co/VR9HFPHmi0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">तुम्ही खात्री बाळगा @EknathKhadseBJP ji , तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नहीं ! सर्वांचे भले होवो ! @BJP4Maharashtra https://t.co/VR9HFPHmi0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 11, 2020तुम्ही खात्री बाळगा @EknathKhadseBJP ji , तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नहीं ! सर्वांचे भले होवो ! @BJP4Maharashtra https://t.co/VR9HFPHmi0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 11, 2020
एमआयडीसीच्या जमिनीशी आपला संबंध नसून आपला व्यवहारही झालेला नाही. जमिनीच्या उताऱ्यावर मूळ मालकाचे आहे. मी महसूलमंत्री होतो म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा संबंध काय? माझ्या बायको आणि जावयाने व्यवहार करायचे नाहीत का? असा सवाल खडसे यांनी केला होता. तसेच समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला असे होते का? जशा त्या स्वतंत्र आहेत तशीच माझी पत्नीही आहे. याव्यतिरिक्त माझे जावई एनआरआय आहेत. त्यांनाही हे अधिकार आहेत, असे खडसेंनी फडणवीस यांना उद्देशून म्हणले होते.
गैरसमज मी नाही, तर देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की, एमआयडीसीची जमीन विकत घेतल्यानंतर माझा राजीनामा घेतला. मूळात एक इंचही जमीन मी खरेदी केलेली नाही. जी जमीन खरेदी केली ती माझ्या बायकोने आणि जावयाने केली आहे. सातबाऱ्यावर आजही मूळ मालकाचे नाव आहे. बायकोने जमीन खरेदी केलेली असताना फडणवीस खडसेंनीच जमीन विकत घेतली असल्याचे सांगत आहेत. हाच असा गैरसमज घेऊन काहीतरी कारण पाहिजे म्हणून चौकशी, रिपोर्ट वैगेरे झाले. विनाकारण मला बदनामी सहन करावी लागली, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली आहे.
यावर उत्तर देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'मी घरचे धुणी बाहेर धूत नाही' असे उत्तर दिले होते. त्या प्रकरणावर स्पष्टपणे भाष्य करत फडणवीस म्हणाले होते, मनिष भंगाळे प्रकरणात खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेनी त्यांच्यावर आरोप लावल्यानंतर मी स्वत: एक कमिटी तयारकरुन १२ तासात अहवाल द्यायला लावला. १२ तासात खडसेंना क्लिन चीट मिळाली आणि भंगाळेला जेलमध्ये टाकले. कित्येक दिवस भंगाळे जेलमध्ये होता. मात्र, खडसे या क्लिन चीटला ड्राय क्लिनरची क्लिन चीट म्हणत असतील म्हणू द्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एकनाथ खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसीची जागा घेतली. त्यांनी स्वत: बैठक घेतली आणि त्याची भरपाई घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खडसेंवर लावण्यात आला. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. खडसेंच्या मागणीनंतर मी न्यायाधिशांची कमिटी तयार केली. त्यानंतर त्याचा अहवाल आमच्याकडे आला. त्याआधी काही जण उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा असा निर्णय दिला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला. मी आकसापोटी गुन्हा दाखल केलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान आता फडणवीस-खडसे वादात अमृता फडणवीस उतरल्याने हा वाद आता कुठे जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.