ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडवणीस ब्लॅकमेल प्रकरण; अनिक्षाला जामीन तर अनिल जयसिंघानीला कोठडी - अनिल जयसिंघानीला न्यायालयीन कोठडी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच प्रकरणात अडकवण्याच्या प्रकरणी अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी या दोघांविषयी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Amruta Fadnavis Blackmail Case
Amruta Fadnavis Blackmail Case
author img

By

Published : Mar 27, 2023, 7:04 PM IST

मुंबई : अमृता फडणवीस यांनी आरोप केला होता की, बुकी असलेला अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांनी एकत्र कट रचत अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दहा कोटी रुपये खंडणी आणि लाच देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या मोबाईल क्रमांकावर विविध व्हिडिओ फोटो आणि संदेश पाठवले. या सर्व प्रकरणाची चाहूल लागताच अमृता फडणवीस यांनी मलबार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवला होता. त्यानंतर बाप आणि लेकीवर तात्काळ कारवाई केली गेली. सध्या दोघेही तुरुंगात आहेत. मात्र अनिल जयसिंघानी याने या सर्व आरोपाला नाकारत आमची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. सरकारी पक्षाच्या वकिलांनी याबाबत दावा केला की, अनिल जयसिंघानी आणि मुलगी अनिक्षा यांच्या एकूण व्यवहारांमध्ये संशयास्पद बाबी आढळलेल्या आहेत. ज्या रीतीने त्यांनी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी यांची न्यायालयीन कोठडी आवश्यक आहे.

अटक बेकायदेशीर : 16 मार्चला मुलगी अनिक्षा आणि 20 मार्च रोजी अनिल जयसिंगानींना अटक करण्यात आली होती. आपल्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असून करण्यात आलेली अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यामुळे आम्हाला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचेही ते बोलले होते. अटक झाल्यानंतर 24 तासांच्या आत न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर करणे हे कायद्यानुसार जरूरी आहे; मात्र पोलिसांनी त्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे, असे देखील अनिल जयसिंघानी यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

सर्व बाबी उघड होणार : या घटनेत सरकारी पक्षाच्या वकिलांनी अनिल जयसिंघानी यांचा दावा खोडून काढला. त्यांनी सांगितले की, ज्या रीतीने अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला, त्यांना विविध प्रकारचे संदेश पाठवले, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप पाठवल्या आणि खंडणी आणि लाच याबाबतचे बोलणे केले त्यावरून यांना न्यायालयीन कोठडी दिली पाहिजे. ज्यामुळे चौकशी केली असता सर्व बाबी समोर येतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत दोन्ही बाजू ऐकून अखेर अनिल जयसिंघानी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

हेही वाचा: Rahul Gandhi Savarkar Row : सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या विधानाचा ठाकरे गटाकडून निषेध; काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीला हजर राहणार नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.