मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास या बंगल्यावर गणपती बाप्पाचे सकाळी मोठ्या उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या आरतीनंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्रावरील पुराचे आणि इतर संकटे दूर होऊ दे, अशी मी प्रार्थना केली.
अमृता फडणवीस म्हणाल्या, बाप्पांकडे मी हीच मागणी केली की, राज्यातील जनतेला सुख लाभो, ते आनंदित राहोत. यासोबतच मागील काही दिवसात राज्यात पूर परिस्थितीमुळे संकट आलेले आहे, ते संकट लवकर दूर होऊन राज्यातील जनता पुन्हा एकदा आनंदी आणि सुखी होवो.