ETV Bharat / state

राज्यातील 'अँफोटेरिसीन बी इंजेक्शन'ची टंचाई लवकरच होणार दूर - भारत सिरम

सगळीकडे कोरोनाचे मोठे संकट आहे. यामध्येच आता 'म्युकरमायकोसिस'च्या नव्या आजाराचे संकट आले आहे. यावरील उपचारासाठी 'अँफोटेरिसीन बी' या इंजेक्शनची आवश्यकता आहे. या इंजेक्शनचा सगळीकडे तुटवडा आहे. मात्र, आता राज्यातच या इंजेक्शनच्या उत्पादनाला परवानगी मिळाली आहे.

राज्यातील 'अँफेटेरीसिन बी इंजेक्शन'ची टंचाई लवकरच होणार दूर

author img

By

Published : May 22, 2021, 7:06 PM IST

मुंबई- कोरोनाच्या बरोबरीने राज्यात आता काळ्या बुरशीचे अर्थात 'म्यूकरमायकोसिस'चे संकट आहे. या आजाराचे रुग्ण राज्यात मोठ्या संख्येने वाढत असताना, या आजारावरील 'अँफोटेरिसीन बी' या इंजेक्शन'चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हे औषध वेळेत उपलब्ध होत नसल्याने हा आजार बळावत आहे. यामध्ये रुग्णांच्या जीवाला धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता अन्न आणि औषध प्रशासना 'एफडीए'ने ही टंचाई दूर करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार एकीकडे देशभरातील औषध उत्पादकांकडून जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. तर, दुसरीकडे आता राज्यातच या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी तीन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात या इंजेक्शनची निर्मिती वाढून ही टंचाई दूर होईल, अशी माहिती औषध मुख्यालयचे सहआयुक्त डी. आर. गहाणे यांनी दिली आहे.

'दररोज ५ हजार इंजेक्शनची गरज'

'म्यूकरमायकोसिस' हा दुर्मीळ आणि बुरशीजन्य आजार आहे. हा आजार ५० ते ६० वर्षे जूना आहे. मधुमेही, किडनीचे आजार असलेल्या लोकांना होत असल्याचे समोर आले आहे. वर्षाला राज्यात कमी प्रमाणात रुग्ण आढळतात. तर, या आजाराचा मृत्यूदर ६० ते ७० टक्के इतका आहे. हा आजार घातक मानला जातो. हा आजार कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना, ज्या रुग्णांच्या रक्तातील साखर वाढते यांना होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 'म्यूकरमायकोसिस'चे संकट गडद झाले आहे. आतापर्यंत राज्यात २०००पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. या आजारावरील अँफोटेरिसीन बी या इंजेक्शनची मोठी टंचाई आहे. हा आजार दुर्मीळ असल्याने या इंजेक्शनची मागणी ही कमी आहे. त्यामुळे इंजेक्शनचे उत्पादनही कमी प्रमाणात होते.

किंमत ५ ते १० हजार रुपये

अचानक 'म्यूकरमायकोसिस'च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यानुसार सध्या राज्यात दिवसाला सुमारे ७ हजार इंजेक्शनची गरज लागत आहे. परंतु, देशभरातच इंजेक्शनचा तुटवडा असल्याने या संख्येत इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे गहाणे यांनी सांगितले आहे. किमान ५ हजार तरी इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान हे इंजेक्शन ५ ते १० हजार रुपये किंमतीचे असून, एका रुग्णाला दिवसाला ६ इंजेक्शन लागतात. तर, किमान २८ दिवस हे इंजेक्शन द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.

'एकच कंपनी करत होती उत्पादन'

'म्यूकरमायकोसिस'वरील अँफोटेरिसीन बी या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. देशभरात फार कमी कंपन्या या इंजेक्शनची निर्मिती करतात. राज्यात फक्त 'भारत सीरम' ही एकच कंपनी या इंजेक्शनची निर्मिती करते. त्यामुळे राज्यात आता मागणी वाढली आहे. मात्र, या मागणीच्या तुलनेत पुरवठा होताना दिसत नाही. एफडीएकडून देशभरातील अँफोटेरिसीन बी इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न दररोज होतो आहे. परंतु, रुग्णसंख्या खूप वाढत असल्याने अँफोटेरिसीन बी इंजेक्शनची टंचाई वाढतच जाणार आहे. ही बाब लक्षात घेत एफडीएने राज्यातच या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आणखी तीन फार्मा कंपन्यांना अँफोटेरिसीन बी इंजेक्शनच्या उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. लवकरच या कंपन्या आपले उत्पादन सुरू करतील. तेव्हा येत्या दोन-तीन आठवड्यात इंजेक्शनचा तुटवडा बऱ्यापैकी दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'या तीन कंपन्या करणार 'अँफोटेरिसीन बी'ची निर्मिती'
'म्यूकरमायकोसिस'वरील अँफोटेरिसीन बी इंजेक्शनचे राज्यात उत्पादन भारत सीरम या एकमेव कंपनीकडून होत आहे. मात्र, आता राज्यात आणखी तीन कंपन्या या इंजेक्शनचे उत्पादन करणार आहेत. एफडीएने जेनेटिक लाइफ सायन्सेस, वर्धा, कमला लाइफ सायन्सेस, पालघर आणि बीआरडी फार्मा अशा तीन कंपन्यांना 'अँफोटेरिसीन बी'च्या उत्पादनासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या इंजेक्शनचा तुटवडा दूर होईल असा दावा एफडीएकडून केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.