ETV Bharat / state

Amit Shah in Mumbai : गणपती बाप्पाच्या भेटीच्या निमित्ताने सागर बंगल्यावर अमित शाह, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची राजकीय खलबते

Amit Shah in Mumbai : गणपती बाप्पाच्या भेटीच्या निमित्ताने सागर बंगल्यावर अमित शाह, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची राजकीय खलबते झाली आहेत. यामध्ये नेमके काय बोलणे झाले त्याची थेट माहिती मिळू शकली नाही. मात्र काही कळीच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 9:54 PM IST

Amit Shah in Mumbai
Amit Shah in Mumbai

मुंबई Amit Shah in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाचे निमित्ताने आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सर्वात प्रथम मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील गणेशोत्सव मंडळाला भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लालबागचा राजा, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी व त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावर तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त काळ एकांतात चर्चा झाली. ही चर्चा नक्कीच राजकीय असणार परंतु सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर या चर्चेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा - सागर बंगल्यावर झालेल्या या तिन्ही नेत्यांच्या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडीवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहेच. त्याबरोबर सध्या राज्यात प्रामुख्याने गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्याचप्रमाणे धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तर ओबीसी समाजानेही आपले आरक्षण कुणाला देता कामा नये यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर मुस्लिम समुदायाला ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही आहेत. या सर्व आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर नुकतेच संसदेमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर झाले असून २०२४ च्या निवडणुका नंतर हे आरक्षण लागू होणार असले तरी त्या दृष्टिकोनातून राज्यात त्याचा कितपत फायदा होऊ शकतो याबद्दलही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांची अनुपस्थिती - अमित शहा यांचा हा छोटेखानी मुंबई दौरा असला तरी सुद्धा या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असल्याकारणाने ते आज अमित शाह यांच्या दौऱ्यात येऊ शकले नाहीत, असं सांगण्यात येत असलं तरी सुद्धा अमित शाह यांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याकारणाने यावरही बरीच खलबतं झाली आहेत. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी केलेल्या टिकेनंतर अजित पवार यांचे भाजपमध्ये खच्चीकरण सुरू आहे का? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा - राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचे गट शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मंत्रिमंडळाची शपथ देण्यात आली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार होणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत आहे. यापूर्वीही जेव्हा-जेव्हा अमित शाह मुंबईमध्ये आले त्या दरम्यान विस्ताराबाबत चर्चा झाल्या आहेत. आजही या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर भाजपाचे नेते, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी २०२४ च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा..

  1. Amit Shah Lalbagh Raja Darshan : अमित शाह यांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळालाही दिली भेट
  2. Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांच्या विरोधात मी बोलले नाही, बोलणारही नाही, कारण...; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
  3. Ganesh Festival 2023 : पर्यावरण पूरक बाप्पा म्हणून गिरगावच्या राजाची ओळख; भाविकांची होतेय गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.