ETV Bharat / state

इम्युनिटी क्लिनिकमुळे प्रतिकारकशक्ती चांगली होण्यास मदत - अमित देशमुख - अमित देशमुख इम्युनिटी क्लिनिक न्यूज

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आयुष इम्युनिटी क्लिनिकचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा आज सकाळी पार पडला. होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानीमुळे आपली प्रतिकार शक्ती चांगली होण्यास मदत होत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Amit Deshmukh
अमित देशमुख
author img

By

Published : Sep 3, 2020, 3:16 PM IST

मुंबई - राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता नैसर्गिक पध्दतीने रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी 'इम्युनिटी क्लिनिक' संकल्पना समोर आली आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानीमुळे आपली प्रतिकार शक्ती चांगली होण्यास मदत होत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

अमित देशमुख यांच्या हस्ते आयुष इम्युनिटी क्लिनिकचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा आज सकाळी पार पडला. यावेळी आयुष टास्क फोर्स, कोविड-19 चे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. मनोज राका, डॉ. अमित दवे, डॉ. कुलदीप कोहली, डॉ, शुभा राऊळ, डॉ.राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. जुबेर शेख आदी उपस्थित होते.

इम्युनिटी क्लिनिक प्रकल्पाला महाराष्ट्र कोविड-19 आयुष टास्क फोर्सकडून परवानगी दिली मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यात 650 क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात आणखी 500 क्लिनिक सुरू केले जाणार आहेत. कोविड-१९ या आजारावर अजूनही औषधे किंवा लस उपलब्ध झालेली नाही. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर नैसर्गिक पद्धतीने प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी क्लिनिक सुरू केल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.