ETV Bharat / state

65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी - सांस्कृतिक मंत्री - amit deshmukh news

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अमित देशमुख
अमित देशमुख
author img

By

Published : Aug 19, 2020, 7:07 PM IST

मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका/ओटीटी यांच्या चित्रीकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय 30 मे 2020 व 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.

उच्च न्यायालाने ही अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने, आता ६५ वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील, अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.