मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (andheri east by election) महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. मात्र नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (Ambadas Danve criticize BJP).
नोटाला क्रमांक दोनची मते: शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंकडे सहानुभूतीची लाटमुळे पराभव अटळ असल्याने भाजपने ऐनवेळी माघार घेतली. भाजपच्या माघारीनंतर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. मात्र, छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक झाली. या निवडणुकीत लटकेंनी छोटे पक्ष आणि अपक्षांचा सुफडा साफ करत दणदणीत विजय मिळवला. मात्र, मोठ्या प्रमाणात नोटाला मते मिळाली. यावरून आता आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर संशय घेत जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे: अंबादास दानवे म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा विजय हा ऐतिहासिक आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हानंतर मशाल चिन्हाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. परंतु, भाजपने माणुसकीचा मुलामा देण्याचा प्रयत्न करून नोटाच्या आड राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली आहे.