ETV Bharat / state

Tata Mumbai Marathon : गोव्याची १२ वर्षीय एलिसा फर्नांडिस टाटा मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात यंग स्पर्धक! - एलिसा फर्नांडिस टाटा मुंबई मॅरेथॉन

१५ जानेवारीला मुंबईत संपन्न होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यासाठी एक १२ वर्षाची मुलगी सहभागी होणार आहे. एलिसा फर्नांडिस असे तिचे नाव असून ती गोव्याची आहे. एलिसा फर्नांडिस ही सर्व मॅरेथॉन धावपटूंमध्ये सर्वात युवा धावपटू असणार आहे. फर्नांडिस आपल्या आईसह स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Elisa Fernandes
एलिसा फर्नांडिस
author img

By

Published : Jan 12, 2023, 8:58 PM IST

एलिसा फर्नांडिस टाटा मुंबई मॅरेथॉन मधील सर्वात यंग स्पर्धक

मुंबई - बहुप्रतिक्षित आशियातील प्रतिष्ठित १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पुन्हा दोन वर्षानंतर नवीन जोमाने येत्या रविवारी १५ जानेवारीला मुंबईत संपन्न होत आहे. देश-विदेशातील तब्बल ५५ हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनच्या विविध कॅटेगिरीमध्ये भाग घेतला आहे. या सर्व मॅरेथॉन स्पर्धकांमध्ये सर्वात युवा असणारी एलिसा फर्नांडिस ही १२ वर्षाची गोव्याची मुलगी आपल्या आईसह या मॅरेथॉनमध्ये सामील होणार आहे.

एलिसाने केली मॅरेथॉनमध्ये धावण्याची तयारी- एलिसाने मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्याची तयारी गोव्यामध्ये सुरू केली आहे. मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी, शनिवारी ती आपल्या आईसह मुंबईत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी एलिसा वयाची १२ वर्षे पूर्ण करत असून ती आपला वाढदिवससुद्धा मुंबईत साजरा करणार आहे.

मॅरेथॉन मधील सर्वात युवा स्पर्धक एलीसा - येत्या रविवारी होणाऱ्या १८ व्या टाटा मुंबई मॅरेथॉन साठी संपूर्ण मुंबई नगरी दोन वर्षानंतर पुन्हा एकदा नवचैतन्याने सज्ज झाली आहे . जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही विश्वातील १० मॅरेथॉन स्पर्धा मधली एक असल्याने यामध्ये धावण्यासाठी प्रत्येक स्पर्धक इच्छुक असतो, तर बऱ्याच जणांच हे एक स्वप्न असतं.

मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये धावण्यासाठी सज्ज - अशीच एक १२ वर्षाची गोव्याची मुलगी एलिसा फर्नांडिस कित्येक वर्षापासून मुंबई मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी मन बनवून बसली होती. यंदा हा योग जुळून आला आहे. एलिसा फर्नांडिस इयत्ता सहावीत शिकत असून मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये धावण्यासाठी ती सज्ज झाली आहे. यासाठी गोव्यामध्ये ती सकाळ-संध्याकाळ धावण्याची तयारी करत आहे.

Alyssa Fernandes
एलिसा फर्नांडिस यांना सायकलिंग करण्याची आवड

५५ हजार स्पर्धक धावणार - या सर्व मॅरेथॉनमध्ये तब्बल ५५ हजार धावक धावणार असून एलिसा ही सर्वात यंग, कमी वयाची मुलगी या मॅरेथॉनमध्ये सामील होणार आहे. विशेष म्हणजे मॅरेथॉनच्या आदल्याच दिवशी एलिसा आपला १२ वर्षाचा वाढदिवस मुंबईत साजरा करणार आहे. कारण त्याच दिवशी ती गोव्याहून आपल्या आईसह मुंबईमध्ये येत आहे. एलिसाला लहानपणापासून रनिंग, सायकलिंगची आवड असून एलिसाने ८ वर्षाची असतानाच ५ किलोमीटर रनिंग स्पर्धा पूर्ण केली होती, अशी तिची आई एब्लिन फर्नांडिस सांगते.

धावण्याबरोबर योगा, सायकलिंग सुद्धा - ड्रीम रन कॅटेगिरीमध्ये एलिसाला धावण्यामध्ये तिची साथ देणार आहे तिची आई एब्लिन फर्नांडिस. मायलेकी दोघीही ड्रीम रन या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. वास्तविक एलिसाला ओपन १० किलोमीटर रन या कॅटेगिरीमध्ये सहभाग घ्यायचा होता. परंतु त्यामध्ये तिला सहभाग घेता आला नाही. एलिसा केवल १२ वर्षाची असून ती गोव्यामध्ये ५, १० किलोमीटर या शर्यतीमध्ये भाग घेते.

Alyssa Fernandes
गोव्यातील स्पर्धेत सहभाग

एलिसाला सायकलिंगची आवड - एलिसाला सायकलिंगची सुद्धा फार आवड असून ती सायकलिंग सुद्धा करते. ५०, १०० किलोमीटर सायकलिंग एलिसा पूर्ण करते. या मॅरेथॉन विषयी बोलताना एलिसा सांगते की, मी गोव्याहून मुंबई मॅरेथॉनमध्ये ड्रीम रन या कॅटेगरीमध्ये भाग घेतला असून त्यासाठी मी लवकरच मुंबईत पोहोचत आहे. या मॅरेथॉनसाठी मी काही दिवस सकाळी तर, काही दिवस संध्याकाळी सराव करते. त्याचबरोबर शरीर लवचिक ठेवण्यासाठी योगाचाही अभ्यास करते. मी सोबत सायकलिंग सुद्धा करते. मी लवकरच मुंबईत येणार असून या मॅरेथॉनमध्ये धावून मी माझं स्वप्न पूर्ण करणार असल्याचेही एलिसा म्हणते.

हर दिल मुंबई - "हर दिल मुंबई" असे यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी असंख्य इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु सर्वांना यात मनाप्रमाणे सहभागी होता येत नाही. कारण काही ठराविक कॅटेगिरीसाठी काही ठराविक जागा शिल्लक ठेवल्या असतात. जो लवकरात लवकर नोंदणी करेल त्याला त्या कॅटेगिरीमध्ये धावण्याची परवानगी दिली जाते.

जगभरातील धावपटूंचा सहभाग - यंदा ५५ हजारांहून अधिक हौशी तसेच व्यावसायिक धावपटू जगभरातून या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. जगभरातील एलीट धावपटू त्याचबरोबर सामान्य नागरिकांसोबत, सेलिब्रेटी, लोकप्रतिनिधी सुद्धा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन धावत असतात. बरेच धावपटू वेगवेगळ्या उद्देशाने सुद्धा एखाद्या एनजीओला मदत म्हणून सुद्धा धावत असतात. अशातच "हर दिल मुंबई" या ब्रीदवाक्या प्रमाणे गोव्याची एलिसा आपली आई एब्लिन हीच्याबरोबर या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावून आपलं स्वप्न साकार करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.