ETV Bharat / state

Vikram Gokhale Mohan Joshi विक्रम गोखले मोहन जोशींची जुगलबंदी सोबत रामदास आठवले, राजु शेट्टीही

author img

By

Published : Aug 28, 2022, 7:29 PM IST

कसदार अभिनेते अशी विक्रम गोखले Actor Vikram Gokhale यांची ओळख आहे राष्ट्र या चित्रपटाच्या माध्यमातुन त्यांची जेष्ठ अभिनेते मोहन जोशी Veteran actor Mohan Joshi यांच्या सोबत अभिनयाची जुगलबंदी Along with Vikram Gokhale Mohan Joshis Jugalbandi पहायला मिळत आहे. वर्तमान काळातील राजकीय परिस्थिती तसेच आरक्षणाच्या संवेदनशील मुद्यावरील या चित्रपटात रामदास आठवले आणइ राजु शेट्टी Ramdas Athawale Raju Shetty too यांच्याही भुमिका प्रेक्षकांना पहायला मिळत असुन प्रेक्षकांना या दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी पसंतीस पडत असल्याचे पहायला मिळत आहे

Vikram Gokhale, Mohan Joshi
विक्रम गोखले मोहन जोशी

‘नटसम्राट’ मध्ये प्रेक्षकांना विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळाली होती आता तश्याच प्रकारची अभिनय जुगलबंदी Vikram Gokhale Mohan Joshis Jugalbandi विक्रम गोखले आणि मोहन जोशी यांच्यात राष्ट्र या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतेय. अर्थातच या जुगलबंदया चित्रपटाची उंची वाढविण्यासाठी असतात आणि त्यात वैयक्तिक काहीही नसते राष्ट्र मध्ये विक्रम गोखले यांनी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत समाजातील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला असून त्यातून त्यांचा राजकीय बाणा सुद्धा बघायला मिळत आहे

काही कलाकारांच्या केवळ उपस्थितीमुळे प्रेक्षकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आशयसंपन्न कथानकाला सकस अभिनयाची जोड देणारे कलाकार असलेला चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावतो. राष्ट्र या मराठी चित्रपटात मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीच पहायला मिळत आहे. विक्रम गोखलेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे राष्ट्र ला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. गोखले यांनी आजवर साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे.

अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ असे ज्यांचे वर्णन केले जाते ते विक्रम गोखले राष्ट्र मध्ये काहीशा अनोख्या रंगात दिसत असून जेष्ठ अभिनेते मोहन जोशी त्यांच्या तोडीस तोड भूमिका साकारताना दिसत आहेत. राष्ट्र हा चित्रपट वर्तमान काळातील राजकीय परिस्थितीवर कडक शब्दांत भाष्य करणारा आहे. यात आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे समाजात उमटत असलेल्या पडसादांचे चित्र राष्ट्र मध्ये पहायला मिळत आहे. प्रथमच मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या इंदरपाल यांनी या चित्रपटाद्वारे आरक्षणाची नवी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव आदी कलाकार आहेत. याशिवाय मंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेतेही राष्ट्रच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहेत. निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली राष्ट्र चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केले आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा राष्ट्र २६ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा Actor Om Bhootkar श्यामची आईमध्ये अभिनेता ओम भूतकर साकारणार साने गुरुजींची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.