मुंबई : कधी कुणाच्या कानशिलात लगावणे, तर कधी कुठल्या अधिकाऱ्याला दम देणे, यासाठी प्रसिद्ध झालेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार बांगर यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत (Allegation on MLA Santosh Bangar) आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली (MLA Santosh Bangar abused policeman) आहे. त्यांनी याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमदार बांगर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
काय आहे प्रकरण ? याबाबत अधिक माहिती अशी की, २७ ऑक्टोबर रोजी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असतांना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या आमदार बांगर यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. तर अशा पद्धतीने आता तू मला शिकवणार का ? असे म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्याने या घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली (Allegation on MLA Santosh Bangar) आहे.
बांगर यांचा नकार ? या प्रकरणावर बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की, मी कोणतीही शिवीगाळ केली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नसल्याचे आमदार बांगर म्हणाले आहेत. मात्र आपण गार्डन गेटने गेलो होतो, हे आमदार बांगर यांनी मान्य केले (Allegation abused policeman on MLA Santosh Bangar )आहे.