ETV Bharat / state

Ajit Pawar : अजित पवारांनी थेट गाठले पोलीस स्टेशन, वसतीगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी चौकशीची केली मागणी, अपयशी सरकार असल्याची टीका - Ajit Pawar on Mumbai hostel girl rape

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथील मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपीने देखील आत्महत्या केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Jun 7, 2023, 7:59 PM IST

अजित पवार

मुंबई : मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचाराची घटना घडणे हे सरकारचे अपयश आहे. सरकारने या घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

'घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हायला हवा' : अजित पवार म्हणाले की, 'मुंबईत अशा घटना कशा काय घडतात? राज्यातील कुठल्याही कानाकोपऱ्यात मुलींना आणि महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. याला पोलीस आणि सरकार जबाबदार आहे. या घटनेचा तपास अत्यंत पारदर्शकपणे झाला पाहिजे. सावित्रीबाई फुले वसतीगृहात 450 मुलींची व्यवस्था आहे. मात्र 10 टक्केच मुली या वस्तीगृहात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही एकच मुलगी चौथ्या मजल्यावर राहत होती. पोलिसांनी वसतीगृहाच्या महिला रेक्टरची चौकशी केली आहे.'

'मुलीला आणि पालकांना न्याय मिळाला पाहिजे' : ते पुढे म्हणाले की, वसतिगृहाच्या जवळून मोठा रस्ता जातो. या परिसरात अनेक व्हीआयपी मंत्री ये-जा करत असतात. त्यामुळे हे वसतिगृह अडगळीत होते असे म्हणता येणार नाही. ज्याने हे कृत्य केलं त्याने स्वत: आत्महत्या केली आहे. आमच्या मुलीला एकटीलाच चौथ्या मजल्यावर का ठेवलं?, असा मुलीच्या पालकांचा प्रश्न आहे.' अजित पवार यांनी मुलीला आणि तिच्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

'वसतीगृहात महिला सुरक्षा कर्मचारी का नाही?' : सावित्रीबाई फुले वसतीगृहात महिला सुरक्षा कर्मचारी नसल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, यापूर्वीच्या काळात अनेक ठिकाणी पुरुष सिक्युरिटी असायची. मात्र आता पोलीस दलात 50 टक्के महिला आहेत. त्यांची वसतीगृहात सुरक्षारक्षक म्हणून कशी नेमणूक झाली?, वस्तुस्थिती काय आहे? किती जणांनी हे कृत्य केले?, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

कोल्हापुरातील घटनेवर अजित पवार म्हणाले.. : कोल्हापूरमधील घटनेवर अजित पवार म्हणाले की, कोल्हापूरमध्ये जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या प्रयत्न केला जातोय का? हे तपासायला हवे. यापूर्वी देखील राज्यातील वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्याचे प्रकार झाले आहेत. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात अशा प्रकारचे कृत्य केलं जात आहे का, अशा चर्चाही सुरु असल्याचे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News: मरिन ड्राइव्ह येथील मुलींच्या वसतिगृहात बलात्कार करून विद्यार्थिनीची हत्या? संशयित सुरक्षारक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.