मुंबई - मंत्रीमंडळ विस्तारानंतर सर्वांना खातेवाटपाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खातेवाटपाचा तिढा आता सुटला आहे. या खातेवाटपामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रिपद देण्यात आले आहे.
दरम्यान, सत्तास्थापनेच्यावेळी अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र, बंड करूनही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रिपद मिळाल्यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय खातं असणार आहे. तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण आणि पर्यटन, एकनाथ शिंदेंकडं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असणार आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री, तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे जलसंपदा खाते असणार आहे.