मुंबई Ajit Pawar Group X Account Suspended :अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांना घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार यांना आपलं समर्थन दिलंय. तर काही आमदार अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
नियम न पाळल्याने अकाउंट सस्पेंड : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाउंट देखील वेगळे आहेत. यातल्या अजित पवार गटाच्या अकाऊंटवर कारवाई झाली (Ajit Pawar Group X Account) आहे. ट्विटर म्हणजेच एक्सकडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड (X Account Suspended) करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यावर सध्या कोणतीही पोस्ट दिसत नाही. तर नियम न पाळल्याने हे अकाउंट सस्पेंड करण्यात आलं असल्याचं ट्विटरकडून (एक्स) सांगण्यात आलं आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. मात्र, ट्विटरने नेमक्या कोणत्या नियमांचं उल्लघंन केल्याने ही कारवाई केली, याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (sharad pawar) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट पडल्याचं (Sharad Pawar Vs Ajit Pawar) पाहायला मिळालं. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते पक्षउभारणीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
हेही वाचा -