मुंबई Supriya Sule criticizes BJP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भाजपावर (भारतीय जनता पक्ष) टीकास्त्र सोडलं आहे. तसंच त्यांनी भाजपाला "भ्रष्ट जुमला पक्ष" संबोधल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्यची शक्यता आहे. त्या आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक तसंच अजित पवार यांचा भजपा अपमान करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे. तसं पत्र त्यांनी अजित पवार यांना लिहिलं आहे. "मी ते पत्र वाचलं असून नवाब मलिक यांचा त्या पत्रातून अपमान झाला आहे. हे अत्यंत चुकीचं असून भाजपा भ्रष्ट जुमला पक्ष बनल्याची टीका त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांवर 40% कर : पुढे बोलताना त्या म्हणल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमली पदार्थ माफीयाविरोधात कोणतीही कारवाई करायची नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळं त्यांनी नवाब मलिक, अजित पवार गटाचा अपमान केला, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे केला आहे. तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर 40% कर लादण्यात आला आहे. का कर अन्यायकारक असून इथेनॉलबाबत घेतलेला, निर्णयही अत्यंत चुकीचा असल्याचं खासदार सुळे म्हणाल्या.
भाजपानं नवाब मलिकांसोबत जे केलं ते चुकीचं आहे. नवाब मलिक यांनी ड्रग माफियांविरुद्ध लढा दिलाय. भाजपा भ्रष्ट जुमला पक्ष झाला आहे. नवाब मलिक भाजपाचा पर्दाफाश करत राहतात. एखादी व्यक्ती दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष असते, मग भाजपा खोटे आरोप कसे करू शकते? याबाबत न्यायालय न्याय करेल. नवाब मलिक यांना न्याय मिळेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. - सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्रात सूडाचं राजकारण सुरू : यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यात गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्रात सरकारी पातळीवर धोरण पंगू झाल्याचं मी सातत्यानं सांगत आहे. निर्णय वेळेवर होत नाहीत. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर असून जालन्यामध्ये घडलेल्या घटनेचे तीन वेगवेगळी उत्तर देण्यात आली, त्या उत्तरांचा मी निषेध करते. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार अतिशय असंवेदनशील आहे. राज्यात आयकर, ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे. जे भ्रष्ट आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपा बसत आहे. देशहिताची भाषा करणाऱ्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं जात आहे. महाराष्ट्रात सूडाचं राजकारण सुरू असल्याचं आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत, अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
हेही वाचा -