मुंबई: पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन तो अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी होत आहे. तसेच 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात आजही लोकसभेत गोंधळ झाला आहे. राज्यात विशेषतः मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कर्मचाऱ्यांना एकाच मापात तोलू नये: शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीवरील शेत पिकांचे नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यातच गेल्या सात दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा वेळेस सरकारने समजूतदारपणे काम करण्याची आवश्यकता असताना संजय गायकवाड हे आमदार अत्यंत संवेदनशील वक्तव्य करतात. सरकारी कर्मचारी 75 टक्के हरामाची कमाई खातात हे अत्यंत निंदनीय वक्तव्य असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच मापात तोलू नये, असे पवार यावेळी म्हणाले आहेत.
पालकांकडून शाळा चालू: सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अशा ठिकाणी काही सुशिक्षित तरुण आणि पालकच शाळा चालवत आहेत. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार याबाबत उदासीन आहे. सरकार या प्रश्नावर चर्चा करायला तयार नसल्याने आपण सभात्याग करत असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा वेळेस संप सुरू असल्याने पंचनामे करायला कोणीही कर्मचारी अधिकारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे महसूल नियमानुसार ताबडतोब नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करावी. तसेच त्याचे वाटप सुरू करावे, तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.